पालकत्व निभावताना... : बकेट लिस्ट

आशिष तागडे
Saturday, 31 October 2020

‘बाबा, दसऱ्याला मला फार काही घेता आले नाही, आता दिवाळीला काय घेणार आहात आणि आता दुकानेही पूर्वीप्रमाणेच सुरू झाली आहेत. बाबा, असे करा दिवाळीला तुम्ही मला मस्तपैकी लॅपटॉप घ्या...’’ अथर्व मोठ्या उत्साहात बाबांना सांगत होता. त्याला जरा थांबवत मनीष म्हणाला, ‘‘यादी संपली, की अजून काही आहे. कारण, तुझी ‘बकेट लिस्ट’ची रेल्वे थांबायचे नावच घेत नाही. आणि दसऱ्याला फार काही घेता आले नाही, म्हणजे काय रे? तुला पाहिजे तो ड्रेस घेतला. ऑनलाइन क्लाससाठी तुला चांगले हेडफोन पाहिजे होते ते घेतले आणि हो आता व्यायामाचे खूळ डोक्यात आल्याने स्पोर्ट्‌स शूज घेतले आणि काय पाहिजे होते?’’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अथर्व माघार घ्यायच्या मूडमध्ये अजिबात नव्हता. ‘‘अरे बाबा, त्याची आवश्यकता होती म्हणून घेतले ना. सणाच्या निमित्ताने काहीतरी वेगळे घेतले पाहिजे की नाही? आणि बरे झाले आठवले, पुढील महिन्यात वाढदिवसही आहे. त्यानिमित्ताने काहीतरी घ्यावेच लागणार ना. दिवाळी आणि वाढदिवस एकाच महिन्यात आले, त्याला माझा काही दोष नाही ना...’’ बाबाला चिमटा काढत अथर्वने बकेट लिस्टचे शेपूट वाढवले.

आता मात्र हसावे की रडावे, हेच मनीषला लक्षात येईना. त्याला जवळ घेत मनीष म्हणाला, ‘‘अथर्व, तुझे बरोबर आहे. या वयात तुला नवनवीन गोष्टींचे वेड असणारस हे स्वाभाविक आहे. त्यादृष्टीने तुझी बकेट लिस्ट असावीच. दिवाळी, वाढदिवसाला नवीन काहीतरी घ्यायला पाहिजे, ही तुझी भावनाही बरोबर आहे. तू पुढील वर्षी बारावी होऊन नव्या शैक्षणिक जगतात प्रवेश करणार आहेस, याची मला कल्पना आहे. यासाठी मी एक बकेट लिस्ट तुला सांगतो. या वयातच आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाकडे प्राधान्याने लक्ष देण्याची गरज असून, त्यासाठी ही बकेट लिस्ट नक्कीच उपयोगी पडेल. तू तुझ्यातील आत्मविश्वास, संभाषणकौशल्य, निर्णयक्षमता, धैर्य, सकारात्मक विचारसरणी, दूरदृष्टी, संतुलित विचारसरणी आणि कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याची क्षमता विकसित कर. एका दिवसात हे होणार नाही. या क्षमतांच्या विकासासाठी भरपूर वेळ लागेल, त्यासाठी पुढील काही गोष्टींकडे तू लक्ष दे.

  • सहानुभूती : समोरच्याला समजून घेण्याची आणि त्याच्याशी भावना शेअर करण्याची क्षमता ठेव.
  • कल्पकता आणि निर्मितीक्षमता : स्वतःमधील सर्व क्षमता पूर्ण वापरून निर्मितीक्षम हो. 
  • उत्कटता आणि तळमळ : ध्येय गाठण्यासाठी तीव्र उत्कटता व तळमळ हवी. 
  • आयुष्यभरासाठी विद्यार्थी असणं : नवनवीन गोष्टी शिकण्याची उमेद कायम असावी. 
  • चांगला श्रोता : समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकून घेण्याची क्षमता विकसित कर. 
  • जबाबदारी : आपल्या निर्णयांची, कृतींची जबाबदारी घेण्याची क्षमता विकसित कर. त्याचबरोबर तार्किकदृष्ट्या आपलं म्हणणं समोरच्याला पटवून त्याच्याकडून कृती करवून घेण्याची क्षमता विकसित करावी लागेल.

सुरुवातीला हे अवघड वाटेल. मात्र, अठरावा वाढदिवस साजरा करून तू लौकिक अर्थाने सज्ञान होशील, त्या वेळी तुला स्वतःमधील बदल नक्कीच समाधानकारक असतील.’’
‘बाबा, मी खरंच हा विचार केला नव्हता. माझ्या बकेट लिस्टपेक्षा तुमची लिस्ट फॉलो करणार,’’ हे सांगायला अथर्व विसरला नाही.

Edited By - Prashant Patil

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article ashish tagade on maintaining guardianship