ग्रुमिंग + : घरच्या घरी ट्रिम करा बॅंग्स!

Bangs-Trim
Bangs-Trim

सोशल मीडियावर लॉकडाउन आणि घरच्या घरी काय करावे, याचे अनेक ट्रेंड सुरू आहेत. मिळालेल्या वेळात घरी राहून अनेक प्रयोग केले जात आहेत. फोटो, कपडे, जेवण याचसोबत आता नवीन ट्रेंड आला आहे, तो केस कापण्याचा. ‘साधना कट’विषयी तुम्हाला माहिती असेलच. इंग्रजीमध्ये त्याला ‘फ्रिंजेस’ किंवा ‘बॅंग्स’ म्हटले जाते. लॉकडाउनमध्ये विविध प्रयोग करत असताना अनेक मुली हा कट ट्राय करत आहेत. तुम्हीही घरच्या घरी बॅंग्स ट्रिम करु शकता, तेही अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करुन. जाणून घ्या याविषयीची अधिक माहिती.

टिप्स -
प्रत्येक चेहऱ्याला हा कट सूट होतोच असे नाही. पण, बॅंग्सची लांबी कमी-जास्त करुन चांगला लुक देतो येईल.
तुमच्या केसाच्या प्रकारावरही हा कट अवलंबून आहे. केस कुरळे असल्यास किंवा मध्यम सरळ असल्यास काळजी घ्यावी.
कपाळाची उंची लक्षात घेऊन मगच केस ट्रिम करावेत.

स्टेप्स -
1) केस कापताना ते पूर्णपणे ओले किंवा अगदीच सुके असू नयेत. त्यामुळे, केस ट्रिम करण्यासाधी किंचितसे ओले करुन घ्या.

2) कपाळाची उंची लक्षात घेऊन आणि तुमचे बॅंग्स डोळ्यापर्यंत येतील अशापद्धतीने ट्रिम करायचे आहेत. पण, हे करत असताना डोळ्यांना त्रास होणार नाही आणि तुम्हाला कॅरी करता येऊ शकतील एवढी उंची ठेवावी.

3) डोक्यावरील अगदी समोरील आवश्यक तेवढे केस हातामध्ये घ्या, उर्वरित केस हळूवारपणे खेचा आणि एक सैल पोनीटेलमध्ये बांधा. आपल्या बॅंग्सला ट्रिम देताना या तंत्राचा प्रयत्न केल्याने आपण कोणत्याही चुका करण्यापासून वाचाल. 

4) घरातील कात्र्या बोथट असतात. त्यामुळे, त्याचा वापर करताना काळजी घ्या. समोरील केस कापत असताना तुम्ही रबराचा वापर करा. हेअर रबर लावून जितक्या लेवलपर्यंत केस कापायचे आहेत तिथपर्यंत बांधा. त्यामुळे कापण्यास मदत होईल आणि कात्री बोटाला लागणार नाही. केसांना लहान भागामध्ये विभाजित करा आणि हळूहळू आपल्या बॅंगच्या बाहेरील अर्था शेवटच्या टोकाला आधी आडव्या पद्धतीने कट करा. बॅंग्सना हलकेपणा येण्यासाठी कात्री थोडी आडवी धरुन आणि हळूवारपणे झिग-झॅग पॅटर्नमध्ये कट करा.

5) पोनिटेल सोडून संपूर्ण केसाची पाहणी करावी. कट हा चेहऱ्याला सूट होण्यासाठी कट केलेल्या बॅंग्सच्या शेजारील केसही कापावेत. अर्थात ‘फ्लिक्स’ही ट्रीम करावेत. कानावर येणारे केस थोडेच हातात घेऊन बॅंग्सपेक्षा मोठे कापावेत.

6) फ्लिक्स कापल्याने केसांचा बन बांधल्यावरही बॅंग्स चांगले दिसतील. तुमच्याकडे स्ट्रेटनर असल्यास त्याने ट्रीम केलेले केस सेट करावेत. चेहऱ्याच्या ठेवणीनुसार बॅंग्स एकाबाजूला, मध्यभागी किंवा मध्यभाग करुनही कॅरी करु शकता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com