मेमॉयर्स : आईमुळेच 'सौंदर्यवती'चे स्वप्न पूर्ण

बेला लोळगे, विजेती, ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’
Sunday, 22 March 2020

आई माझं विश्‍व आहे. या दोन शब्दांमध्ये निःस्वार्थ भावना, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, पाठिंबा लपलेला आहे. आम्ही तिनं भावंडं. त्यात मी सर्वांत मोठी. म्हणजेच सर्वांचीच लाडकी. त्यामुळं तीन वर्षांची असल्यापासूनच मी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी आई मला प्रोत्साहन देत होती. पॅथॉलॉजिस्ट असली, तरी तिला कलाक्षेत्राची प्रचंड आवड आहे. तिनं अनेकांना रांगोळी, मेंदी अन् पेंटिंग शिकविली आहेत. मी सहावी ते दहावीत असेपर्यंत कराटेचे प्रशिक्षण घेतले. त्यात मला ‘ब्लू बेल्ट’ही मिळाला.

आई माझं विश्‍व आहे. या दोन शब्दांमध्ये निःस्वार्थ भावना, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, पाठिंबा लपलेला आहे. आम्ही तिनं भावंडं. त्यात मी सर्वांत मोठी. म्हणजेच सर्वांचीच लाडकी. त्यामुळं तीन वर्षांची असल्यापासूनच मी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा विविध कार्यक्रमांत सहभागी होण्यासाठी आई मला प्रोत्साहन देत होती. पॅथॉलॉजिस्ट असली, तरी तिला कलाक्षेत्राची प्रचंड आवड आहे. तिनं अनेकांना रांगोळी, मेंदी अन् पेंटिंग शिकविली आहेत. मी सहावी ते दहावीत असेपर्यंत कराटेचे प्रशिक्षण घेतले. त्यात मला ‘ब्लू बेल्ट’ही मिळाला. मला दहावीत असताना ९५ टक्के गुण मिळाले. बारावी विज्ञान शाखेत ८० टक्के गुण मिळाले. विशेष म्हणजे, आईसह बाबाही माझा नियमितपणे अभ्यास घेत होते. माझ्यावर ताणतणाव असल्यास तो निवळण्याचा प्रयत्न आई करत होती. त्यामुळं मी टेन्शन फ्री राहत होते. त्याचाच सकारात्मक परिणाम दहावी-बारावी परीक्षेच्या निकालात दिसून आला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला कलाक्षेत्राची आवड होती. त्यामुळं मी बारावीनंतर ‘मिस इंडिया’ होण्याचं स्वप्न पाहिलं. आईनंही त्यासाठी पाठबळ दिलं. त्यासाठी मी प्रयत्न करू लागले. मात्र, यश आलं नाही. या स्वप्नाच्या मागं धावत असतानाच माझा नांदेड येथील गव्हर्न्मेंट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये (केमिकल इंजिनिअर) नंबर लागला. मी तिथं शिक्षणासाठी गेले, पण स्वप्न शांत बसू देत नव्हतं. मी कॉलेजमध्ये काही ना काही ऍक्‍टिव्हिटी करत होते. कॉलेज पूर्ण झाल्यानंतर मी नांदेडवरून औरंगाबादला आले. आता नोकरी करावी, की कला क्षेत्रात जावं याबाबत मी खूपच कनफ्यूज होते. त्यामुळं मनावर ताण येत होता, पण आईनं धीर दिला. तेवढ्यात ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचं आईला पेपर वाचल्यानंतर समजलं. हे वाचून आई खूप आनंदी झाली. तिनं लगेचच मला ही गोष्ट सांगितली. त्याक्षणी मी या स्पर्धेत सहभागी होण्याचं ठरविलं. या स्पर्धेच्या राज्यभरात ऑडिशन झाल्या. त्यामधून २१ तरुणींची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यांचं ग्रुमिंग पुण्यामध्ये कोरिओग्राफर लोवेल प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली झालं. 

मी स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिवशी खूपच उत्सुक होते. मनावर दडपणही होतं. कारण, मी सौंदर्यवती होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी मी प्रयत्नही करत होते. अंतिम फेरीत फस्ट रनरअप, सेकंड रनरअपचे निकाल जाहीर होत होते. मनात धाकधूक वाढत होती. स्पर्धेची विजेती म्हणून बेला लोळगे हे नाव घोषित करण्यात आलं, त्या वेळी माझ्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रूच आले. कारण, मी केलेल्या प्रयत्नांना, कष्टाला आणि मेहनतीला फळ मिळालं होतं. आईचंही स्वप्न पूर्ण झालं होतं. आता मी एमबीए करणार असून, मॉडेलिंगबरोबरच चित्रपटांमध्येही काम करणार आहे. त्याचबरोबर आईचं आणखी एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मालिकेमध्येही अभिनय करणार आहे.... 

(शब्दांकन - अरुण सुर्वे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article bela lolage on mother