किचन + : कुकीजसाठी नक्षीदार लाटणे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 14 June 2020

लॉकडाउनचा काळ सर्वांसाठीच परीक्षा पाहणारा ठरला. मात्र, या काळात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक हॉटेलमध्ये मिळणारे अनेक पदार्थ घरच्या घरी बनवायला शिकले. त्यात बेकरी उत्पादने आघाडीवर होती. लोकांनी ब्रेड, केकपासून कुकीजपर्यंतचे अनेक पदार्थ घरी करून पाहिले.

लॉकडाउनचा काळ सर्वांसाठीच परीक्षा पाहणारा ठरला. मात्र, या काळात काही चांगल्या गोष्टीही घडल्या. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक हॉटेलमध्ये मिळणारे अनेक पदार्थ घरच्या घरी बनवायला शिकले. त्यात बेकरी उत्पादने आघाडीवर होती. लोकांनी ब्रेड, केकपासून कुकीजपर्यंतचे अनेक पदार्थ घरी करून पाहिले. या पदार्थांसाठी विशिष्ट प्रकारची भांडी गरजेची असतात, मात्र लोकांनी डोके चालवून त्याला घरातच पर्याय शोधले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घरातील महिलांबरोबरच ताज्या दमाच्या बल्लवाचार्यांनीही यात हातभार लावला! बिस्किटे आणि कुकीज हा खरेतर पूर्णपणे बेकरीतून खरेदी केला जाणारा पदार्थ, मात्र लोकांनी त्यालाही ‘होम टच’ देत जिभेचे चोचले पुरवून घेतले. कुकीज प्लेन केल्यावर त्यांना बेकरी टच येत नाही, मात्र त्यावर छानसे डिझाइन असल्यास काही औरच मजा येते. असे डिझाइन बनवण्यासाठीची लाटणी ऑनलाइन बाजारात उपलब्ध आहेत.

कुकीजसाठीची कणिक तिंबून ती लाटताना या लाटण्याच्या मदतीने छान डिझाइन तयार करता येते. यामध्ये पारंपरिक लाटण्याबरोबरच रोलिंग प्रकारचे लाटणेही उपलब्ध आहे. लाटण्यावरील एम्बोस (नक्षीचा) केलेला भाग लाटताना दाबून फिरवायचा आणि आपल्याला हव्या त्या डिझाइनच्या कुकीज तय्यार!

वैशिष्ट्ये -
दर्जेदार लाकडापासून बनविलेले.
लग्न, वाढदिवस, नाताळ, दिवाळी आदींसाठी वेगवेगळ्या डिझाइन्स.
हॅंडलसह लांबी ४० सेंटिमीटर, त्यात १९ सेंटिमीटर नक्षी.
लाटण्यावरील नक्षी तुम्ही कोणत्या कार्यक्रमासाठी कुकीज बनवता आहात, त्यानुसार निवडू शकता.
साध्या लाकडाबरोबरच सागवान लाकडातील लाटणीही उपलब्ध. 
(किंमत खूप जास्त)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on cookies

Tags
टॉपिकस
Topic Tags: