esakal | किचन + : डिजिटल एअर फ्रायर
sakal

बोलून बातमी शोधा

digital air fryer

हॉटेलमधील पदार्थ घरातच बनवून पाहण्याची पद्धत आता घराघरांत रुजते आहे आणि त्यामुळेच बाजारात नवनव्या उपकरणांवर नागरिकांच्या उड्या पडत आहेत. गरमागरम, चटपटीत फ्रेंच फ्राइड किंवा असेच तळणीचे पदार्थ सर्वांनाच आवडतात. मात्र, घरांत ते पारंपरिक भांड्यांच्या मदतीने हॉटेलप्रमाणे बनतातच, असे नाही. विशिष्ट तापमान ठेवत हे पदार्थ बनवल्यास ते योग्य पद्धतीचे बनतात.

किचन + : डिजिटल एअर फ्रायर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

हॉटेलमधील पदार्थ घरातच बनवून पाहण्याची पद्धत आता घराघरांत रुजते आहे आणि त्यामुळेच बाजारात नवनव्या उपकरणांवर नागरिकांच्या उड्या पडत आहेत. गरमागरम, चटपटीत फ्रेंच फ्राइड किंवा असेच तळणीचे पदार्थ सर्वांनाच आवडतात. मात्र, घरांत ते पारंपरिक भांड्यांच्या मदतीने हॉटेलप्रमाणे बनतातच, असे नाही. विशिष्ट तापमान ठेवत हे पदार्थ बनवल्यास ते योग्य पद्धतीचे बनतात. त्यासाठी चार लीटर क्षमतेचा डिजिटल एलसीडी कंट्रोल असलेला एअर फ्रायर तुमच्या नक्कीच कामाला येईल. त्यातही एअर फ्रायरचा उपयोग केल्याने तेलाचा वापर कमी होतो व डाएटवर असलेल्यांनाही त्याचा फायदा होतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

असा आहे डिजिटल एअर फ्रायर

  • डिजिटल एलसीडी कंट्रोलच्या मदतीने ८० ते २०० अंश सेल्सिअस तापमान सेट करणे शक्य. 
  • आठ प्रिसेटच्या मदतीने तुम्ही फ्राइज, चिप्स, चिकन, केक व मासेही बनवू शकता. 
  • या एअर फ्रायरमध्ये तेल अत्यंत कमी प्रमाणात लागते. 
  • या फ्रायरमध्ये केकसारख्या पदार्थांचे बेकिंगही करता येते. 
  • डिस्प्लेवरील इंडिकेटरच्या मदतीने पदार्थ पूर्ण तयार झाल्याचे समजते. 
  • मशिनबरोबर डबल लेअर ग्रिल, रेसिपी बुक व युजर मॅन्युअलही मिळते. 

Edited By - Prashant Patil

loading image
go to top