esakal | मेमॉयर्स : खरीखुरी वात्सल्यमूर्ती
sakal

बोलून बातमी शोधा

Dipali-Pansare

माझी आई इंदुमती खूप साधी, सरळ आणि उत्कृष्ट गृहिणी आहे. खरंतर तिनं तिच्या आयुष्यामध्ये खूप दुःख पाहिलं. लहान असताना तिचे आई-बाबा गेले. त्यामुळे दोन भावांचा सांभाळ करण्याची जबाबदारी वयाच्या सातव्या वर्षी तिच्यावरच आली. वयाच्या चौदाव्या वर्षी तिचं लग्न झालं. आमच्या आजीनं तिच्यासाठी नात्यामधलं एक स्थळ पाहिलं. आम्ही पाच बहिणी व एक भाऊ.

मेमॉयर्स : खरीखुरी वात्सल्यमूर्ती

sakal_logo
By
दीपाली पानसरे, अभिनेत्री

माझी आई इंदुमती खूप साधी, सरळ आणि उत्कृष्ट गृहिणी आहे. खरंतर तिनं तिच्या आयुष्यामध्ये खूप दुःख पाहिलं. लहान असताना तिचे आई-बाबा गेले. त्यामुळे दोन भावांचा सांभाळ करण्याची जबाबदारी वयाच्या सातव्या वर्षी तिच्यावरच आली. वयाच्या चौदाव्या वर्षी तिचं लग्न झालं. आमच्या आजीनं तिच्यासाठी नात्यामधलं एक स्थळ पाहिलं. आम्ही पाच बहिणी व एक भाऊ.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आम्हा सर्वांची आईनं खूप काळजी घेतली. तिच्या मनात नेहमी असे की, ‘मला शिकता आलं नाही, माझ्यावर खूप लहान वयात जबाबदारी आली; पण माझ्या मुलांनी इतकं शिकावं, की त्यांना आयुष्यात कुठल्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही.’ ती या मतावर ठाम होती. त्यामुळेच तिनं मला किचनमध्ये जाऊ दिलं नाही. लग्नानंतर मुलगा झाल्यावर मी स्वयंपाक शिकले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माझे वडीलही आम्हाला खूप सपोर्ट करायचे. त्यामुळे माझ्या बहिणी डॉक्‍टर, तर मी सॉफ्टवेअर इंजिनिअर झाले. आई-बाबा आमच्या घरातली उत्कृष्ट जोडी. त्यांनी आमचं सगळ्यांचं भविष्य छान सेटल करून दिलं. मी ॲक्‍टिंगमध्ये आले, त्यामुळे त्यांना खूप टेन्शन आलं. ‘आपल्या घरातलं, नातेवाईकांमधलं आणि गावातलं कुणीही या क्षेत्रामध्ये नाही. त्यामुळे मला हे जमेल का,’ असं त्यांना वाटायचं. आमची मुलगी बिर्ला इंडस्ट्रीमध्ये जॉब करते, असं ते सांगायचे. कारण, रात्री-अपरात्री चित्रीकरण अन् त्यात या क्षेत्राची कोणतीही शाश्वती नसते. या गोष्टींमुळे त्यांना भीती वाटत असे; पण मी टीव्हीवरील मालिकांमध्ये दिसू लागले, त्यावेळी त्यांना त्या क्षेत्रातली माहिती होऊ लागली. तुमच्याकडे टॅलेंट असेल आणि तुम्हाला जर अभिनय जमत असेल तरच पुढील प्रोजेक्‍ट येतात, हे त्यांना समजलं. 

दरम्यान, मी ‘इस प्यार को क्‍या नाम दूँ’, ‘एजंट राघव’, ‘ढूँढ लेंगी मंजिल हमने’ या मालिकांत अभिनय केला. त्याचबरोबर ‘फ्रॉड सय्या’, ‘आई तुझा आशीर्वाद’, ‘चालक’ आणि ‘डस्टर’, ‘प्रेमासाठी’, ‘मोस्ट वॉन्टेड’, ‘हॅलो गांधी सर’ या चित्रपटांमध्येही विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. आपल्या मातृभाषेत काम कर, असं ज्यावेळी आई-बाबांनी सांगितलं, त्यावेळी मी ‘देवयानी’ मालिकेत आले. माझी आई स्ट्रॉंग असून तिनं खूप सहन केलं. आई-वडील लहानपणीच गेल्यामुळे तिला निरपेक्ष प्रेम मिळालं नाही; पण तिनें प्रत्येक विचार, प्रत्येक गोष्ट अन् प्रत्येक प्रार्थना आमच्यासाठीच केली. म्हणूनच माझ्याकडे ‘आई कुठे काय करते?’ ही मालिका आली. ही मालिका मी फक्त आईसाठीच केली. या मालिकेची प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली, त्याच्या सुरवातीपासून शेवटपर्यंत मी फक्त रडत होते. कारण, मला माझ्या डोळ्यासमोर आई दिसत होती. 
(शब्दांकन : अरुण सुर्वे) 

Edited By - Prashant Patil