मेमॉयर्स : आई म्हणजे माझी सकारात्मक ऊर्जा

ज्ञानदा रामतीर्थकर, अभिनेत्री
Sunday, 3 May 2020

आईबद्दल मोजक्‍या शब्दांत व्यक्त होणं खूप अवघड आहे. आई म्हणजे माझी ताकद. मी लहान असल्यापासूनच माझ्यातल्या कलाकाराला आई आणि बाबांनी प्रचंड पाठिंबा दिला आहे. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं, तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास आई-बाबांना होता.

आईबद्दल मोजक्‍या शब्दांत व्यक्त होणं खूप अवघड आहे. आई म्हणजे माझी ताकद. मी लहान असल्यापासूनच माझ्यातल्या कलाकाराला आई आणि बाबांनी प्रचंड पाठिंबा दिला आहे. जेव्हा मी अभिनय क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं, तेव्हा माझ्यापेक्षा जास्त आत्मविश्वास आई-बाबांना होता.

जेव्हा मला मुंबईला जाऊन ऑडिशन्स द्यायच्या होत्या, मला मुंबईची काहीच माहिती नव्हती, तेव्हा आई प्रत्येक ऑडिशनला माझ्या बरोबर आली आहे. आईचा पाठिंबा तर होताच; पण त्याचबरोबर तिने वेळोवेळी माझा आत्मविश्वास वाढवला आहे. ती सोबत नसती तर मी हे सगळं अजिबात करू शकले नसते. मुळात ती माझ्या बरोबर नसती तर ही कल्पना सुद्धा करणं माझ्यासाठी कठीण आहे.

आई म्हणजे माझी सकारात्मक ऊर्जा आहे. मी जरा जरी खचतिये असं वाटलं की, ती लगेच मला त्यातून बाहेर काढते. माझ्यापेक्षा आधी ते आईला कळत असतं. हे सगळं जरी असलं तरी मी लहान असताना आई तितकीच कडक पण होती. उगाच प्रत्येक लाड तिने पुरवले नाहीत. या गोष्टीचा तेव्हा राग यायचा, पण आता त्याची खरी किंमत कळते. एखादी गोष्ट माझ्याजवळ नसली तरी मला त्रास होणार नाही. आपल्याकडे जे आहे, त्यात आपण प्रचंड सुखी राहू शकतो हे तिने शिकवलं. त्याचबरोबर स्वतःची प्रगती करणंही तितकंच महत्त्वाचं आहे हे ही तिने सांगितलं. भरकटत असताना कान पकडून तिने गाडी रुळावर आणली आहे. ‘सख्या रे’, ‘जिंदगी नॉट आउट’, ‘शतदा प्रेम करावे’, ‘इअर डाऊन’ या मालिकांमध्ये मुख्य भूमिका तर ‘धुरळा’ या चित्रपटात चांगली भूमिका साकारण्याची संधी मिळाली. यामागेही आईचा आशीर्वाद होता. खरंतर असा हा प्रचंड मोठा ऊर्जेचा स्रोत असाच माझ्याबरोबर सदैव राहो हीच प्रार्थना.
शब्दांकन - अरुण सुर्वे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Dnyanada Ramtirthkar on mother

Tags
टॉपिकस
Topic Tags: