वुमन हेल्थ - एग फ्रीजिंग आणि गर्भधारणा

डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
Sunday, 26 July 2020

‘एग फ्रीजिंग’ प्रक्रियेला ओसाईट क्रायो प्रिझर्व्हेशन असेही म्हणतात. या प्रक्रियेच्या माध्यमातून बीजअंडी भविष्यात पुन्हा वापरता येतील अशा प्रकारे गोठवून सुरक्षितरित्या साठवतात. ती भविष्यात दाम्पत्याच्या पालक होण्याच्या इच्छेनुसार वापरली जाऊ शकतात. गोठवलेली बीजअंडी पुन्हा नेहमीच्या तापमानाला आणून प्रयोगशाळेत त्यांचा शुक्राणूंशी संयोग घडवून आणला जातो आणि मग त्याचे स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते.

‘एग फ्रीजिंग’ प्रक्रियेला ओसाईट क्रायो प्रिझर्व्हेशन असेही म्हणतात. या प्रक्रियेच्या माध्यमातून बीजअंडी भविष्यात पुन्हा वापरता येतील अशा प्रकारे गोठवून सुरक्षितरित्या साठवतात. ती भविष्यात दाम्पत्याच्या पालक होण्याच्या इच्छेनुसार वापरली जाऊ शकतात. गोठवलेली बीजअंडी पुन्हा नेहमीच्या तापमानाला आणून प्रयोगशाळेत त्यांचा शुक्राणूंशी संयोग घडवून आणला जातो आणि मग त्याचे स्त्रीच्या गर्भाशयात रोपण केले जाते. हा इन्व्हिट्रो फर्टिलायझेशनचाच एक भाग आहे. एग फ्रीजिंग ही प्रक्रिया नक्की कशा पद्धतीने केली जाते, त्यामाधील जोखीम, तुमची गरोदर राहण्याची क्षमता लक्षात घेऊन ही प्रक्रिया तुमच्यासाठी योग्य आहे किंवा नाही याविषयी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एग फ्रीजिंगचा पर्याय कधी?

  • तुमच्या गरोदर राहण्याच्या क्षमतेवर परिणाम घडवणारी वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाली असेल तर उदा. सिकलफेल ॲनिमिया किंवा ल्युपससारख्या ऑटोइम्युन प्रकारचे आजार (स्वयंप्रतिकार रोग) असल्यास.
  • तुम्ही कर्करोगवर उपचार घेत असल्यास किंवा गरोदर राहण्याच्या क्षमतेवर परिणाम करणारा अन्य कोणता गंभीर आजार झाला असल्यास विशिष्ट उपचाराअंतर्गत देण्यात येणाऱ्या रेडिएशन किंवा केमोथेरपीमुळे गरोदर राहण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. असे उपचार घेण्यापूर्वीच फ्रीजिंग केल्यास भविष्यात स्वतःची मुले होणे शक्य होऊ शकते.
  • तरुण वयातील बीजे सुरक्षित ठेवून भविष्यात वापरणे या पद्धतीमुळे शक्य होऊ शकते. काही कारणाने तरुण वयात मूल होऊ देणे शक्य नसल्यास त्यावेळी एग फ्रीजिंगचा अवलंब करून पुढे तुमची तयारी झाल्यावर त्याचा उपयोग करणे शक्य असते.

एग फ्रीजिंग हे तंत्रज्ञान नवीन असल्यामुळे खर्चिक ठरू शकते. यात बीजअंडी सुरक्षितपणे स्त्रीच्या शरीरातून बाहेर काढून घेणे आणि एग फ्रीजिंग प्रक्रियेनुसार ती सुरक्षित ठेवणे, हे पर्याय असतात. तुम्ही फ्रिज केलेली बीजअंडी भविष्यात मूल होण्यासाठी वापरणार असल्यास त्यावेळचे तुमचे वय आणि एग फ्रीजिंग केल्यापासूनचा काळ महत्त्वाचे घटक ठरतात. वयस्कर झाल्यानंतर एग फ्रीजिंग केल्यास आणि त्यानंतर अधिक काळाने गरोदर राहण्याचा प्रयत्न केल्यास गर्भपाताची जोखीम वाढते. स्त्रीबीजे सुरक्षित ठेवण्याची इच्छा असल्यास सुसज्ज फर्टिलिटी क्लिनिकचे साहाय्य घ्यावे. या क्षेत्रातील तज्ञांना रिप्रोडकटिव्ह एंडोक्रोनोलॉजिस्ट म्हणतात.
एग फ्रीजिंगपूर्वी काही रक्तचाचण्या कराव्या लागतात. उदा.

ओव्ह्येरियन रिझर्व्ह टेस्टिंग (AMH)
बीज अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता निश्‍चित करण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची असते, तसेच गर्भाशयाच्या कार्यक्षमतेची पूर्ण कल्पना येण्यासाठी एक वेगळी रक्तचाचणी आणि ओव्हरीजची अल्ट्रासाऊंड चाचणी करतात.

संसर्गजन्य रोगांसाठी चाचणी
एचआयव्ही, हेपेटायटीस ‘बी’ किंवा ‘सी’सारख्या आजारांचे निदान करण्यासाठीही रक्तचाचणी होते.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr aasha gawade on women health