वुमन हेल्थ : स्तन्यपान : बाळासाठी आरोग्यदायी जीवनाचा पाया

Baby
Baby

आईच्या दुधाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. स्तन्यपान म्हणजे आई आणि बाळाला जोडणारा दुवा आहे. मातृत्वाच्या प्रवासात स्तन्यपानाला महत्त्व दिले जाते. त्या माध्यमातून बालकाच्या निरोगी आणि सुंदर जीवनाची सुरुवात करून घ्या. बाळासाठी आरोग्यदायी जीवनाचा पाया इथेच सुरू होतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  

स्तन्यपानाविषयी जनजागृती, प्रसार करण्याची, त्यासंबंधी योग्य माहिती प्रसारित करण्याची आणि त्याला पाठिंबा देण्याची नितांत गरज आहे. दरवर्षी ऑगस्टचा पहिला आठवडा जागतिक स्तन्यपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी जागतिक स्तनपान सप्ताहासाठी ‘सपोर्ट ब्रेस्ट फीडिंग फॉर ए हेल्दीअर प्लॅनेट’ ही संकल्पना आहे. 

बालकांसाठी पहिल्या किमान सहा महिन्यांपर्यंत स्तन्यपान महत्त्वाचे असताना जगभरातील अनेक माता, विशेषतः शहरी भागात व्यग्र आणि वेगवान जीवनशैली अनुसरणाऱ्या अनेक मातांना हे शक्य होत नाही आणि त्या आपल्या बालकासाठी कृत्रिम आहाराची सोय करतात. वस्तुततः कोणत्याही नवजात बालकासाठी मातेचे दूध हाच सर्वोत्तम आहार असतो. स्तन्यपान योग्यप्रकारे देण्यास प्रारंभ करण्यासाठी आणि ते कायम राखण्यासाठी मातेला योग्य मदतीची गरज असते. त्यामुळे अनेकदा कुशल समुपदेशकाचे साहाय्य घेणे आवश्यक ठरते. आईचे पहिले पिवळे दूधाला कोलॉस्ट्रम म्हटले जाते.

त्याला बाळाचे प्रथम लसीकरण म्हणता येईल. कारण ते इम्युनोग्लोबुलिनने युक्त असते. हे दूध कमी प्रमाणात असले तरीही यामध्ये अधिक प्रमाणात अँटीबॉडी वाढीचे घटक आणि जीवनसत्त्वे उपलब्ध असतात म्हणूनच, बाळ जन्मल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांच्या आतच स्तन्यपान सुरू करावे. स्तन्यपान करताना बाळाचे तोंड योग्यरित्या स्तनाच्या संपर्कात असावे. त्यामुळे बाळाला योग्य प्रमाणात दूध मिळते आणि स्तनास दुखापत होत नाही. स्तन्यपान करताना आईची बसण्याची स्थिती सोयीस्कर असावी. 

आईचे दूध मुलाला विविध संक्रमण, दस्त आणि उलटी यांसारख्या अनेक आजारांपासून दूर ठेवते. मुलाला पुढील आयुष्यातही मधुमेह, उच्च रक्तदाब तसेच अनेक असाध्य रोगांपासून बचाव करण्यासाठी महत्त्वाचे ठरते. 

कोरोना काळात स्तन्यपान
कोरोनाचा काळ स्तन्यपान देणाऱ्या मातांसाठी हा अधिकच आव्हानात्मक आहे. या काळात स्वच्छता राखणे, आरोग्यासाठी सर्व सुरक्षेचे उपाय, अन्य व्यक्ती किंवा अन्य पृष्ठभागांशी संपर्क टाळणे, पौष्टिक आहार घेणे, पाणी भरपूर पिणे, पुरेशी विश्रांती घेणे आणि शांत राहणे या उपाययोजनांचा अवलंब मातेसाठी आवश्यक ठरतो. मातेने आहारात हिरव्या पालेभाज्या, तसेच कडधान्य, डाळी व इतर पोषक घटकांचा समावेश करावा. बालकाला रोगप्रतिकारक शक्ती नैसर्गिकरीत्या मिळवून देण्यासाठी मातेचे दूध हे उत्तम पोषकद्रव्ये व औषध असते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com