आईशी संवाद : लहान मुलांची झोप...

डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
Saturday, 11 April 2020

मुलांच्या जन्मापासून ते अगदी कुमारवयापर्यंत वाढ व विकासामध्ये झोपेची महत्त्वाची भूमिका असते. त्यासाठी झोपेची नेमकी गरज समजून घ्यायला हवी. या पूर्ण झोपेच्या तासांमध्ये अनेक कारणाने व आधुनिक जीवन शैलीच्या सवयीमुळे फरक पडत चालला आहे. वयाप्रमाणे काही गोष्टींची काळजी घ्यावी. 

मुलांच्या जन्मापासून ते अगदी कुमारवयापर्यंत वाढ व विकासामध्ये झोपेची महत्त्वाची भूमिका असते. त्यासाठी झोपेची नेमकी गरज समजून घ्यायला हवी. या पूर्ण झोपेच्या तासांमध्ये अनेक कारणाने व आधुनिक जीवन शैलीच्या सवयीमुळे फरक पडत चालला आहे. वयाप्रमाणे काही गोष्टींची काळजी घ्यावी. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिला महिना संपल्यावर बाळाला आईपासून वेगळं झोपवायला हरकत नाही, पण झोळीमध्ये किंवा खेड्यात पलंगामध्ये झोळी बांधून झोपवतात; तसे कधीही झोपवू नये. त्यामुळे बाळाची मान हनवटीतून छातीकडे दाबली जाते व बाळाला श्‍वास घेण्यास त्रास होऊ शकतो. पसरट व चौकोनी व भक्कम झोपाळ्यात झोपवायला हरकत नाही. बऱ्याचदा प्लॅस्टिक, फायबरचे झोपाळे तुटतात व बाळ त्यातून खाली पडू शकते. आपोआप हलत राहणारे इलेक्ट्रिक झोपाळे वापरू नये. 

बाळाला झोपविण्यासाठी थोडा वेळ पाळणा हालवावा लागणे ठीक आहे, पण ते झोपत नसल्यास खूप वेळ म्हणजे १५-२० मिनिटांपेक्षा जास्त पाळणा हालवत बसू नये. बाळाला नैसर्गिकरित्या झोप येण्याची वाट बघावी. झोपताना बाळाशी बोलावे, गप्पा माराव्यात. या वयात बाळाला पोटावर झोपवू नये. नेहमी पाठीवरच झोपवावे. या एका सवयीने पाळण्यात अकस्मात मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये खूप बदल घडून आल्याचे दिसून आले. म्हणून अमेरिकेत ‘स्लीप ऑन बॅक’ अशी राष्ट्रव्यापी मोहीमच सुरू केली. आपल्या देशातही अशीच बाळाला पाठीवर झोपवा ही मोहीम व्हायला हवी. बाळाला फार लुसलुशीत गादीवर नव्हे, तर थोड्या कडक म्हणजे आपण झोपायला वापरतो तशा गादीवर झोपवावे. बाळाचे तोंड व नाक उघडे राहील, हे बघावे. बाळाला जराही हालचाल करता येणार नाही असे गुंडाळू नये.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr amol annadate on Baby sleep