Video : जन्मानंतरचा पहिला तास

डॉ. अमोल अन्नदाते
Friday, 3 January 2020

बाळाच्या आयुष्यातील पहिला दिवस आणि पहिला तास हा अत्यंत निर्णायक असतो. हा एक दिवस कसा जातो यावरच बाळाचे आरोग्यदृष्ट्या भवितव्य ठरते. बाळाच्या जन्माच्या वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिथे बालरोगतज्ज्ञांची उपस्थिती. बाळाचा जन्म झाल्या झाल्या ते मोठ्याने रडले पाहिजे. त्यातूनच त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होतो व मेंदूला रक्तपुरवठा सुरू होतो.

आईशी संवाद - डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ
बाळाच्या आयुष्यातील पहिला दिवस आणि पहिला तास हा अत्यंत निर्णायक असतो. हा एक दिवस कसा जातो यावरच बाळाचे आरोग्यदृष्ट्या भवितव्य ठरते. बाळाच्या जन्माच्या वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, तिथे बालरोगतज्ज्ञांची उपस्थिती. बाळाचा जन्म झाल्या झाल्या ते मोठ्याने रडले पाहिजे. त्यातूनच त्याचा श्वासोच्छ्वास सुरू होतो व मेंदूला रक्तपुरवठा सुरू होतो. आपल्या देशात जन्मतः नीट न रडल्यामुळे २० टक्के बालकांचा मृत्यू व ४.६ टक्के बालके मतिमंद होतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जन्माच्या वेळी प्रसूतीच्या खोलीत प्रशिक्षित बालरोगतज्ज्ञ उपस्थित असल्यास ते बाळ रडावे म्हणून पहिल्या मिनिटात उपचार व उपाययोजना करतात. 

1) बाळाच्या जन्मानंतर पहिला सोपस्कार म्हणजे नाळेला क्लिप लावून ती कापणे व आईपासून बाळ वेगळे करणे. याविषयीची आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे भारतात डॉक्टर, पालकांना अद्याप नीटशी माहीत नाहीत. नाळेला क्लिप लावण्यास व ती कापण्यास किमान एक मिनीट थांबून वारेतून रक्त बाळाकडे वाहू द्यायला हवे. हे बाळाच्या भावी वाढीच्या दृष्टीने हितकारक असते. काही वेळा क्लिपऐवजी दोरा वापरला जातो. त्यामुळे बाळाला जंतुसंसर्ग होऊन जिवाला धोका निर्माण होतो. याचा वापर टाळण्याकडे लक्ष असायला हवे. 

2) नाळ कापल्यावर बाळाला गरम निर्जंतुक, स्वच्छ टॉवेलमध्ये घेऊन बालरोगतज्ज्ञ बाळाला स्वच्छ करतात व त्याचा श्वास, हृदयाचे ठोके व जन्मजात व्याधींसाठी तपासणी करतात. 

3) प्रसूती अजून सुरूच असली, तरी बाळाला आईच्या दोन्ही स्तनांमध्ये पालथे टाकावे. दोन्ही बाजूने बाळाला आधार द्यावा. यामुळे बाळाला ऊब मिळते व स्तनपानासाठी आई व बाळ दोघांना प्रोत्साहन मिळते. स्तनाग्रांचा काळा रंग व त्यातून स्रवणाऱ्या दुधाच्या सुगंधामुळे बाळाच्या दृष्टी व घ्राणशक्तीला उत्तेजना मिळते. बाळ स्वतःहून स्तनपान करते. याला ‘ब्रेस्ट क्रॉल’ असे म्हणतात. असे केल्यास बाळ जन्मानंतर पहिला एक तास स्तनपान करते. 

पहिल्या तासातील आईच्या दुधात विशेष गुणधर्म असतात. ज्यामुळे पहिल्या वर्षातील जंतुसंसर्ग आणि भावी आयुष्यात अॅलर्जीसारखे आजार टळतात. पहिल्या तासात स्तनपान केल्याने आपल्या देशात दर वर्षी १० लाख बाळांचे जीव वाचू शकतात. स्तनपान करताना बाळ आईच्या दोन्ही स्तनांच्या मध्ये पडते, तेव्हा ते दोन्ही पाय खाली मारते. त्यामुळे प्रसूतीनंतर वार (प्लासेंटा) बाहेर पडण्यास मदत होते. बाळ स्तनपान करू लागल्याने ऑक्सिटोसीन हा संप्रेरेक स्रवतो, ज्यामुळे गर्भाशय आकुंचन पावते व प्रसूतीनंतर होणारा रक्तस्राव कमी होतो व प्रसूतीपश्चात वेदनेसाठी ऑक्सिटोसीन औषधाचे काम करते. बाळाच्या जन्मानंतर त्याला पावडरचे दूध पाजणे टाळावे. एक तास झाल्यावर ज्या नातेवाइकाकडे आई प्रसूतिगृहातून बाहेर येईपर्यंत बाळाची निगा राखण्यासाठी देणार आहे, त्याने हात स्वच्छ धुतलेले असावेत.

माझे घर
आपल्या घरात असतो आपण खास सजवलेला कोपरा. आपल्या भावभावनांशी जोडलेला. अशा कोपऱयांनी सजतं घर. शेअर करा हा कोपरा. सजवलेलं आपलं घर. फोटोंसह.

माझी रेसिपी
खायला आणि खाऊ घालायला तुम्हाला आवडतं का? मग शेअर करा तुमची आवडती रेसिपी...फोटोंसह...
व्हॉटस्ॲप- ९१३००८८४५९
email :  maitrin@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr amol annadate on born baby