esakal | आईशी संवाद : नाकातून रक्त वाहणे
sakal

बोलून बातमी शोधा

Blood-flow-in-Nose

तीन ते आठ वर्षांदरम्यान नाकातून रक्ताची धार लागणे ही समस्या बऱ्याचदा उद्‍भवते. याला घोळणा फुटणे असेही बोलीभाषेत म्हटले जाते. ही पालक व घरातील सदस्यांसाठी भीतीदायक असते; यात घाबरून जाण्यासारखे काही नसते. हे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होते.

आईशी संवाद : नाकातून रक्त वाहणे

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते, बालरोगतज्ज्ञ

तीन ते आठ वर्षांदरम्यान नाकातून रक्ताची धार लागणे ही समस्या बऱ्याचदा उद्‍भवते. याला घोळणा फुटणे असेही बोलीभाषेत म्हटले जाते. ही पालक व घरातील सदस्यांसाठी भीतीदायक असते; यात घाबरून जाण्यासारखे काही नसते. हे हिवाळ्यामध्ये जास्त प्रमाणात होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रक्त कुठून येते?
नाकाच्या शेंड्याच्या भागात नाकाला रक्तपुरवठा करणाऱ्या सर्व रक्तवाहिन्या एकत्र येतात. या भागातील नाकाचे आतील आवरण हे इतर भागांपेक्षा जास्त नाजूक असते. म्हणून नाकाच्या शेंड्याच्या म्हणजे पुढे व समोरच्या भागातून रक्त वाहत असते.

कारणे

  • नाकातून रक्त वाहण्याचे सर्वांत जास्त प्रमाणात अढळणारे कारण म्हणजे बोटाने नाक टोकरणे होय. लहान मुलांना नाकात बोट घालण्याची सवय असते. त्यातून आतील खपली निघते व रक्त वाहू लागते. सर्दी, अॅलर्जी, सायनसचा संसर्गामुळे नाकात खपल्या जमतात व त्या निघतात तेव्हा रक्त वाहू लागते. 
  • काही कारणासाठी नाकात स्टेरॉईडचे स्प्रे दिले जातात. त्यानंतर असे नाकातून रक्त येण्याची शक्यता असते. 
  • प्लेटलेट्स कमी झाल्यामुळे तसेच रक्त गोठवणाऱ्या घटकांची जन्मजात कमतरता, आजार असल्याने नाकातून रक्त वाहते; पण हे कारण खूपच कमी मुलांमध्ये असते. म्हणून रक्त वाहत असेल, तर हेच कारण असेल असे समजून घाबरून जाऊ नये.

उपचार
    मुलाला उभे करा, चेहरा पुढे व खाली करून थोडे पुढे वाकून उभे राहायला सांगा. असे केल्यावर आईने वरून चिमटीत पूर्ण नाक बंद करून दाबून ठेवावे व मुलाला तोंड उघडे ठेवून तोंडावाटे मोठे श्वास घेण्यास सांगावे.  नाकातून येणारे रक्त काही वेळात अपोआप थांबत असते, त्यामुळे हा उपाय दहा मिनिटांपर्यंत करत राहावा. त्यानंतर चिमटीत पकडलेले नाक सोडून रक्त येते आहे का हे तपासून पाहावे. याने रक्त थांबत नसेल, तर डॉक्टरकडे जावे. डॉक्टर नाकात बँडेजचा रोल टाकतात व रक्त येणारी जागा बंद करतात. नाकाभोवती बर्फ एका कापडात गुंडाळून पकडल्यानेही रक्त थांबू शकते. 

नाकातून रक्त येणे टाळण्यासाठी
    मुलांमधील नाक टोकरण्याची सवय मोडली पाहिजे. दर वर्षी हिवाळ्यात/ उन्हाळ्यात रक्त येत असेल, तर नाकात अधूनमधून नॉर्मल सलाईनचे ड्रॉप टाकून नाकाच्या आतील भाग ओला राहील हे पाहता येते; पण नाकात तेल/ तूप टाकू नये.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top