esakal | आईशी संवाद : अवघड जागेचे दुखणे
sakal

बोलून बातमी शोधा

Discussion-with-Mother

लहान मुलांमध्ये; त्यातच मुलींमध्ये लघवी मार्गाची लांबी असल्याने व शौचाची जागा लघवी मार्गाजवळ असल्याने लघवी मार्गाचा जंतूसंसर्ग जास्त प्रमाणात आढळतो.

आईशी संवाद : अवघड जागेचे दुखणे

sakal_logo
By
डॉ. अमोल अन्नदाते

लहान मुलांमध्ये; त्यातच मुलींमध्ये लघवी मार्गाची लांबी असल्याने व शौचाची जागा लघवी मार्गाजवळ असल्याने लघवी मार्गाचा जंतूसंसर्ग जास्त प्रमाणात आढळतो.

लक्षणे

  • ताप व थंडी 
  • लघवी करताना जळजळणे/ दुखणे 
  • जास्त वेळा लघवीला जावे वाटणे व लघवी आल्यावर लगेचच लघवीला जावे वाटणे 
  • लघवीवरचा ताबा सुटणे
  • रात्री झोपेतून उठून लघवीला जावे वाटणे 
  • बेंबीखाली मूत्राशय असते तिथे दुखणे 
  • लघवीचा वास येणे, गढूळ लघवी होणे 
  • तीन वर्षांखालच्या मुलांमध्ये बऱ्याचदा ताप हे लघवी मार्गाच्या संसर्गाचे एकमेव लक्षण असते. यासोबतच नीट जेवण न करणे, वजन न वाढणे, जुलाब, उलट्या हेही लक्षण असू शकते. 
  • लघवीच्या खालच्या मार्गाचा संसर्ग वर किडनीपर्यंत गेला, तर त्याला ‘पायलो नेफराययटीस’ असे म्हणतात. यात मूल गंभीर होऊ शकते व या स्थितीत उपचार सुरू करणे गरजेचे असते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कारण
त्वचा किंवा शौचाच्या जागेवरून किंवा संसर्गित हातांच्या माध्यमातून हा संसर्ग होतो. काही मुलांमध्ये लघवी खाली येण्याऐवजी उलट्या मार्गावर किडनीमध्ये जाते. यामुळेही संसर्ग होतो. मूतखड्यामुळेही लघवी मार्गाच्या संसर्गाची शक्यता वाढते. 

निदान
लघवीची तपासणी करून त्यात संसर्ग आहे की नाही, हे सांगता येते. सोनोग्राफी करून मूत्राशय व किडनी संसर्गित झाली आहे का, हे कळते. 

उपचार
लघवी मार्गाच्या संसर्गासाठी बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने विशिष्ट अँटिबायोटिक ७ ते १४ दिवसांसाठी घ्यावी लागतात. औषधांचा कोर्स अर्धवट सोडल्यास संसर्ग परत उद्‍भवू शकतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लघवी मार्गाचा संसर्ग टाळण्यासाठी -
लघवीची जागा स्वच्छ करताना पुढून मागे अशा प्रकारे करावी 
लघवी रोखून धरण्याची सवय मोडावी 
तहान असेल तसे पाणी प्यायला हवे 
बद्धकोष्ठता असल्यास त्याचे उपचार करावेत

Edited By - Prashant Patil

loading image
go to top