esakal | वुमन हेल्थ : गरोदरपणाच्या काळात या गोष्टी टाळा
sakal

बोलून बातमी शोधा

Pregnant-Women

गरोदरपणामध्ये मातेने स्वत:ची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात काही टाळता येणाऱ्या चुका पुढीलप्रमाणे...

वुमन हेल्थ : गरोदरपणाच्या काळात या गोष्टी टाळा

sakal_logo
By
डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ

गरोदरपणामध्ये मातेने स्वत:ची आणि होणाऱ्या बाळाची काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात काही टाळता येणाऱ्या चुका पुढीलप्रमाणे...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

  • वाहतुकीचे साधन म्हणून दुचाकी चालवणे ही खूप सामान्य गोष्ट आहे आणि ती गरोदर महिला चालवू शकतात. पण, विशेष करून गर्भवती महिलांनी दुचाकी अतिशय हळू चालवावी. वाहनाचा वेग  नेहमीच ताशी वीस-तीस किलोमीटरच्या आसपास असावा. स्पीड ब्रेकरकडेदेखील लक्ष देणे आवश्यक आहे. एखाद्या वेळेस स्पीड ब्रेकरमुळे किंवा वेगाने वाहन चालविल्यामुळे धक्का बसला असेल तर पोटदुखी आणि पाठदुखी होण्याची शक्यता असते. ज्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोकादेखील निर्माण होऊ शकतो.
  • गर्भवती महिलांनी दहा-पंधरा किलोपेक्षा जास्त वजनाच्या अवजड वस्तू उचलू नयेत. महिलेने अवजड वस्तू उचलली, तर त्यामुळे वेदना होण्याची, रक्तस्राव होण्याची शक्यता असते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वजन उचलताना महिलेने थेट वाकू नये. त्यासाठी पहिल्यांदा गुडघ्यावर वाकले पाहिजे आणि नंतर ती वस्तू जमिनीवरून उचलली पाहिजे.
  • गरोदरपणात कॉफी आणि इतर कॅफिनयुक्त पदार्थांचे सेवन करणे टाळले पाहिजे. कॉफीच्या बियांत असणारे उत्तेजक द्रव्य एक व्हॅसोकॉन्स्ट्रिक्टर (रक्तवाहिन्या अरुंद करणारे) म्हणून कार्य करते; ज्यामुळे बाळाच्या रक्तप्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्याऐवजी चहा, ग्रीन टी यांचे सेवन करू शकता.
  • गरोदरपणात पिकलेली पपई खाल्ली तर चालेल; मात्र कच्ची पपई खाऊ नये.
  • धूम्रपान किंवा मद्यपान कटाक्षाने टाळावे. सॉफ्ट ड्रिंकचेही सेवन टाळले पाहिजे. कारण, त्यात प्रिझर्व्हेटिव्ह असतात. त्यांचा बाळावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
  • गरोदर महिलेला रक्तस्राव किंवा स्पॉटिंगची समस्या असेल, तर त्यांनी गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत लैंगिक संबंध टाळावेत. लैंगिक संबंध ठेवल्यामुळे रक्तस्राव होण्याचा धोका वाढू शकतो.
  • फळांचा रस प्यायचा असेल, तर केवळ ताज्या फळांचा रस पिणे योग्य. पॅक केलेल्या फळांच्या रसामध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असते.
  • बाहेरच्या स्टॉलमधील अजिनोमोटो असलेल्या चायनीज पदार्थांचे सेवन करणे पूर्णपणे टाळणे आवश्यक. शक्यतो घरी बनवून खावेत.
  • नेहमीच ताजे अन्नपदार्थ खावेत आणि दैनंदिन आहाराचे व्यवस्थित नियोजन करावे. दिवसभर थोड्या थोड्या प्रमाणात आहारसेवन करणे गरजेचे असते. शिळे अन्नपदार्थ खाण्याचे टाळावे.
  • डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे घ्यावीत. मातेला आणि बाळाला पौष्टिक आहाराबरोबरच लोह, कॅल्शियम आणि प्रथिनांची आवश्यकता असते. आहार आणि औषधे या दोन्हींचे नियमितपणे मातेने सेवन करणे महत्त्वाचे आहे.

गरोदरपणातील नऊ महिने हे मातेसाठी आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. खाण्या-पिण्याच्या तुमच्या आवडी पूर्ण करण्यासाठी संपूर्ण आयुष्य पुढे आहे. मात्र, हे नऊ महिने आहाराचे शिस्तबद्ध आणि काळजीपूर्वक नियोजन करा.

Edited By - Prashant Patil

loading image