वुमन हेल्थ : गर्भधारणेबाबतची चाचणी

AMH-Test
AMH-Test

बाळ हवे आहे; पण वंध्यत्वाची समस्या आहे, असे लोक तज्ज्ञांकडे येतात तेव्हा त्यांना थायरॉइड प्रोलॅक्टीनबरोबरच अँटी-मुलेरियन हार्मोनची (एएमएच) चाचणी करण्याचा सल्ला दिला जातो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

एएमएच म्हणजे काय?
एएमएच ही लॅबमध्ये केली जाणारी चाचणी असून, यामध्ये डॉक्टर महिलेच्या गर्भाशयातल्या सुयोग्य बीजांडाची संख्या यांचे मूल्यांकन करतात. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर एएमएच हा बहुतेक वेळेस सर्वसमावेशक गर्भधारणेच्या शक्यतेच्या तपासणीचाच एक भाग असतो आणि यामध्ये महिलेच्या गर्भाशयातील गुणवत्तापूर्ण बीजांडाच्या पेशींची संख्या दर्शविण्यासाठी देखील याचा उपयोग केला जाऊ शकतो अथवा गरोदरपणात महिलेची बीजांडे तयार करण्याची क्षमता यावरून फलित होऊ शकते.

अँटी-मुलेरियन हार्मोन हे अंडाशयात ग्रॅनुलोसा पेशींची निर्मिती करतात. प्रत्येक गर्भाशयात बीजांडांची संख्या निश्चित असते आणि ही संख्या आनुवंशिक घटकच असते. यालाच गर्भाशयातील राखीव जागा अथवा स्टॉक असे म्हणतात. स्त्रियांचे वय वाढत जाते, त्यानुसार अंड्यांची संख्या कमी होते आणि प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत अंड्यांच्या एकूण संख्येमध्ये भिन्नता असते. याचाच अर्थ एएमचची पातळी कमी होत जाते.

एएमएच पातळी
या चाचणीद्वारे रक्तातील अँटी-मुलेरियन हार्मोनचे (एएमएच) प्रमाण मोजले जाते. गर्भधारणेसाठी सुयोग्य अशी किती अंडी आहेत, ते याद्वारे समजते. या चाचणीमध्ये २-४.५ एनजी/एमएल ही सामान्य एएमएच पातळी मानली जाते. ही पातळी २ एनजी/एमएलपेक्षा कमी असेल, तर त्याला कमी एएमएच पातळी म्हणतात आणि १.५ एनजी/एमएलपेक्षा कमी झाल्यास त्याला निम्न एएमएच पातळी म्हणतात. २ एनजी/एमएलपेक्षा कमी पातळी असल्यास पुढील उपचारासाठी सल्ला देण्यात येतो. याबाबतीत फक्त एएमएचची पातळीच महत्त्वाची नसते, तर रुग्णाचे वय, एन्ट्रल फॉलिकल काउंट (एएफसी) चाचणी करावी लागते. या तीनही गोष्टींचा एकत्रित अभ्यास करून गर्भधारणेच्या शक्यतेचा अंदाज तज्ज्ञ बांधू शकतात. महिलेचे वय २५-२६ इतके कमी असेल आणि एएमएच पातळी कमी असली, तरी अंड्यांची गुणवत्ता चांगली असल्याची शक्यता जास्त वयोगटातील महिलांपेक्षा अधिक असते; म्हणूनच गर्भधारणेची शक्यता अधिक असते.

लो एएमएच उपचारपध्दती
चांगल्या एन्ट्रल फॉलिकल काउंटसह रुग्णाचे वय कमी असेल, तर औषधांबरोबरच फोलिक्युलर मॉनिटरिंग आणि इंट्रायुटरिन इनसेमिशनसारख्या (आययूआय) तंत्रांचा वापर केला जाऊ शकतो. या उपचाराने एएमएच पातळी वाढते. परंतु, जर एन्ट्रल फॉलिकल काउंट कमी असेल, वय जास्त असेल आणि एएमएच पातळी १,०.५ एनजी/एमएलपेक्षा कमी असेल, तर अशा व्यक्तीमध्ये नैसर्गिक उपचाराने होणाऱ्या यशाचे प्रमाण कमी असते. कारण, नैसर्गिक उपचारांमध्ये एक-दोन अंडी तयार करण्याचे लक्ष्य असते. अशा रुग्णांसाठी डॉक्टर इन विट्रोफर्टिलायझेशनचा (आयव्हीएफ) सल्ला देऊ शकतात.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com