ग्रुमिंग + : डोळे हे जुल्मी गडे...

Eyes
Eyes

मेकअपच्या दुनियेमध्ये सतत काहीतरी नवीन येत असते. चेहरा आणि लिपस्टिकनंतर आयमेकअप सर्वाधिक महत्त्वाचा. डोळ्याचा मेकअप करणे तितकेही कठीण नाही.

स्टेप्स
सर्वप्रथम डोळ्यांवर प्रायमर लावून घ्या. मेकअप बराच वेळ टिकण्यासाठी प्रायमर लावल्यामुळे डोळ्यांवरील क्रीज लाईन्स कमी दिसतात. मात्र, यासाठी त्वचेच्या रंगसंगतीचं प्रायमर निवडा, त्यामुळे चेहरा आणि डोळे यामध्ये वेगळेपण दिसणार नाही. प्रायमर नसल्यास कन्सिलर किंवा फाउंडेशन बेस म्हणून वापरु शकता.

फ्लॅट ब्रशने शेड लाइट असणारा हायलायटर घ्या आणि डोळ्यांच्या आतील कोपऱ्याला लावून घ्या. आतून बाहेर अशा पद्धतीने तो लावावा.

फ्लफीब्लेंडींग ब्रशने मॅट मीड टोन घ्या आणि डोळ्यांच्या बाहेरील कोपऱ्यापासून आतमध्ये अशापद्धतीने गोलाकार लावा. बाहेरुन आत ब्लेंड करत असताना संपूर्ण डोळ्याला लावू नये. डोळे उघडे ठेवल्यावर दिसणाऱ्या वरच्या भागावर आणि भुवयांच्या खाली काही अंतर ठेवून ते लावावे.

‘गो टू’ ब्रशने गडद असणारा काऊंटर शेड बाहेरुन आत ब्लेंड करा. डोळ्याच्या अगदी बाहेर असणारा भाग त्याने गडद करुन हायलाइट करण्याचा प्रयत्न करा. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आयशॅडो लावल्यावर आयलानरचा वापर करा. तुमच्या संपूर्ण लुकप्रमाणे कॅट स्टाईल, विंग स्टाईल, डबल विंग स्टाईल अशा विविध प्रकारे आयलायनर लावा. ते लावताना काळजी घ्या, कारण चुकल्यास संपूर्ण आयमेकअप खराब होऊ शकतो.

सर्वांत शेवटी मस्कारा लावा. मस्कारा आपण डोळ्यांच्या पापण्यांना लावतो. तो लावण्याआधी पापण्या कर्ल करा. तुमच्या पापण्या अधिक आकर्षक दिसतील. मस्कारा लावताना तो पापण्यांच्या मुळापासून टोकांपर्यंत लावा जेणेकरुन पापण्या जास्त लांब दिसतील. वरच्या पापण्यांसाठी अपवर्ड स्ट्रोक आणि खालील पापण्यांसाठी डाऊनवर्ड स्ट्रोक्स लावा.

आयशॅडो पॅलेट
आयशॅडोसाठी असंख्य पर्याय उपलब्ध असतात. पण, बेसिक आयमेकअप करण्यासाठी तुम्हाला फक्त तीन ते चार रंग गरजेचे आहेत. तुमच्या स्किन टोनपेक्षा एक शेड लाइट असणारा हायलाइटर, आयमेकअप अलगदपणे ब्लेंड करण्यासाठी थोडासा डार्क असणारा मॅट मीड टोन आणि स्किनटोनपेक्षा दोन ते तीन शेड अधिक गडद असणारा काऊंटर शेड, हे तीन बेसिक रंग हवेत. याशिवाय ब्लॅक मॅट आयशॅडोही वापरु शकता.

ब्रश 
आयमेकअपसाठी ब्रशही वेगळे असतात आणि बाजारात सहज मिळतात. आयशॅडो लावण्यासाठी सर्वप्रथम ‘फ्लॅट’ ब्रश वापरावा. आयशॅडो एकसारखा पसरवण्यासाठी ‘ब्लेंडींग’ ब्रश वापरा. याशिवाय ‘गो टू’ ब्रशही वापरला जातो. आयमेकअप करण्यासाठी ब्रशचे संपूर्ण किट तुम्हाला बाजारात सहज उपलब्ध होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com