जोडी पडद्यावरची : मैत्रीचं ‘सुगंधी’ नातं

हर्षद अतकरी - समृद्धी केळकर
Saturday, 3 October 2020

हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर आता स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. हर्षद हा ‘शुभम’च्या व्यक्तिरेखेत, तर समृद्धी ‘कीर्ती’च्या भूमिकेत आहे. हर्षद आणि समृद्धीची पहिली भेट झाली ती ऑनलाईन माध्यमातून!  याच मालिकेच्या निमित्तानं लॉकडाऊनच्या काळात ही ऑनलाईन मीटिंग झाली होती.

हर्षद अतकरी आणि समृद्धी केळकर आता स्टार प्रवाहवरील ‘फुलाला सुगंध मातीचा’ या मालिकेत प्रमुख भूमिकेत आहेत. हर्षद हा ‘शुभम’च्या व्यक्तिरेखेत, तर समृद्धी ‘कीर्ती’च्या भूमिकेत आहे. हर्षद आणि समृद्धीची पहिली भेट झाली ती ऑनलाईन माध्यमातून!  याच मालिकेच्या निमित्तानं लॉकडाऊनच्या काळात ही ऑनलाईन मीटिंग झाली होती. त्यानंतर दोघे भेटले ते थेट मालिकेच्या लूक टेस्टसाठी आणि मग शूटिंगला. हर्षद म्हणाला, ‘‘मी साकारत असलेल्या शुभमचं मिठाईचं दुकान असल्यानं मी या मालिकेसाठी जिलेबी कशी तयार करायची हे शिकलो. मला स्वयंपाकाची आवड असल्यानं हे शिकणं सोपं गेलं.’’ समृद्धी म्हणते, ‘‘कीर्ती ही आयपीएस होण्याचं ध्येय जपणारी मुलगी आहे.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हर्षद आणि समृद्धी या दोघांच्या मैत्रीतला समान धागा म्हणजे दोघांचा मनमोकळा स्वभाव. साहजिकच भूमिका साकारताना ती भूमिका उत्तम साकारली जाते. लॉकडाऊनच्या काळात हर्षदनं स्वतःसाठी खूप वेळ दिला. लॉकडाऊनमध्ये अनेक चित्रपट पाहिले, उर्दूचासुद्धा अभ्यास केला. समृद्धी या काळात कथकचं ऑनलाइनच्या माध्यमातून प्रशिक्षण देत होती. त्यात म्हणजे तिची भूमिका असलेली ‘दोन कटिंग’ ही शॉर्टफिल्म लॉकडाऊनच्या काळातच प्रदर्शित झाली. तसेच ‘नाखवा’ या गाण्याचा तिचा म्युझिक व्हिडिओदेखील त्याच काळात प्रदर्शित झाला. ‘फुलाला सुगंध मातीचा’मध्ये शुभम आणि कीर्तीच्या लग्नाचा सिक्वेन्स आता असणार आहे. हर्षद म्हणाला, ‘‘याआधीच्या मालिकांतदेखील माझे विवाह सोहळे झाले आहेत. त्यामुळे लग्नविधीसुद्धा माझे पाठ झाले आहेत, असं म्हणायला हरकत नाही; पण लग्नाच्या सिक्वेन्सच्या चित्रीकरणाला धमाल येते, हे नक्की.’’ ‘फुलाला सुगंध मातीचा’मधलं हे सुगंधी नातं आता उलगडू लागणार आहे.
(शब्दांकन : गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article harshad atkari and samruddhi kelkar