किचन गॅजेट्स : रिचार्जेबल चॉपर

दररोजच्या पाककलेच्या प्रक्रियेतील न टाळता येणारा भाग म्हणजे भाज्या कापणे, सोलणे होय.
rechargeable chopper
rechargeable choppersakal
Summary

दररोजच्या पाककलेच्या प्रक्रियेतील न टाळता येणारा भाग म्हणजे भाज्या कापणे, सोलणे होय.

दररोजच्या पाककलेच्या प्रक्रियेतील न टाळता येणारा भाग म्हणजे भाज्या कापणे, सोलणे होय. अनेकदा भाज्या, फळभाज्या, कांदा, गाजर, लसूण, ढोबळी मिरची, कोथिंबीर बारीक चिरताना बराच वेळ जातो. त्यात घाईघाईने चिरताना हाताची बोटे कापण्याची शक्यता असते. त्यामुळे ही कामे जलद गतीने करण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या चॉपरचे पर्याय उपलब्ध आहेत. त्यात सध्या जास्त प्रचलित असणारा प्रकार म्हणजे रिचार्जेबल चॉपर होय. हा चॉपरचा नवा प्रकार गृहिणींसाठी नक्कीच फायदेशीर ठरणारा आहे. या चॉपरमध्ये फक्त फळभाज्याचं नाही तर सुक्यामेव्याचे कापही यात व्यवस्थितपणे करता येतात. या इलेक्ट्रॉनिक चॉपर मशीनच्या एका बटनावर चॉपिंगचे काम होते. हा चॉपर उच्च दर्जाच्या फूड ग्रेड मटेरियलपासून बनवलेला असल्याने दीर्घकाळ टिकतो. तसेच या रिचार्जेबल चॉपरमध्ये विविध फळांच्या स्मूदीजदेखील बनवता येतात. तसेच प्रवासातसुद्धा हा चॉपर उपयोगी पडतो.

चॉपरची वैशिष्ट्ये

  • या चॉपरमध्ये ३० व्हॅटच्या मोटारचा वापर करण्यात आला आहे. तसेच हा चॉपर एकदा तीन ते चार तास चार्ज केल्यावर कमीत कमी ३० ते ४० वेळा वापरता येते. या इलेक्ट्रॉनिक चॉपरमध्ये वापरले गेलेली ब्लेड्स अतिशय तीक्ष्ण असल्याने त्यात टाकलेल्या भाज्या बारीक कापल्या जातात.

  • या मशिनमध्ये मॅन्युअली भाज्या किंवा पदार्थ त्यात टाकल्यानंतर, त्यावर झाकण लावावे. त्यानंतर त्या मशीनला असणारे बटन दाबले की, त्याचे काम सुरू होते.

  • या चॉपर मशिनचे पार्टस वेगळे करता येतात. त्यामुळे स्वच्छ करण्यास कोणतीही अडचण येत नाही. चॉपर आकाराने लहान असल्याने जागेचीही बचत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com