

दैनंदिन आहारात पोषक अन्नपदार्थांचा समावेश असावा असा सल्ला कायमच आहारतज्ज्ञांकडून दिला जातो.
दैनंदिन आहारात पोषक अन्नपदार्थांचा समावेश असावा असा सल्ला कायमच आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. आजकाल सततच्या बदलत्या जीवनशैलीनुसार फास्ट फूड खाण्याकडे कल वाढलेला दिसतो. त्यावेजी रोजच्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश केल्यास त्यातून आवश्यक प्रथिने, खनिजे, जीवनसत्त्वे आणि मेद पुरेशा प्रमाणात शरीराला मिळते. परंतु, कडधान्यांना मोड आणण्याची प्रक्रिया कंटाळवाणी, वेळखाऊ आणि किचकट असल्याने बऱ्याचदा स्प्राऊट्स बाजारातून विकत आणले जातात. याला पर्याय म्हणून स्प्राऊट्स मेकरच्या मदतीने स्प्राऊट्स बनवण्याची प्रक्रिया अधिक सोपी होते.
स्प्राऊट्स मेकरची वैशिष्ट्ये
स्प्राऊट मेकर बाजारात प्लास्टिक, माती आणि स्टील या तीन प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. आपल्या सोयीनुसार स्प्राऊट मेकरची निवड करता येते.
स्प्राऊट मेकरचे तीन भाग येतात. सगळ्यात खालच्या भागात निथळलेले पाणी साचते. वरच्या दोन डब्यांमध्ये एक - एक छिद्र दिलेले असते. त्यावर नॉबही येतो. आणि त्यावर झाकण अशी साधारण स्प्राऊट मेकरची रचना असते. त्यातील वरच्या दोन डब्यांमध्ये भिजवलेले कडधान्ये घालून नॉबच्यावर पाण्याची पातळी जाणार नाही याची खात्री करून पाणी टाकावे. त्यांनतर दोन्ही छिद्रे एका खाली एक येऊ न देता विरुद्ध दिशेने येतील असे भांडे ठेवावे आणि झाकण लावावे. काही तासानंतर अंकुरित कडधान्ये तयार होतात.
घरगुती, पारंपरिक पद्धतीने कडधान्याला मोड आणण्यासाठी भिजवलेली धान्ये, पाण्यातून उपसल्यानांतर पातळ, सुती कापडात घट्ट बांधून, दमट जागेत ठेवावे लागते. ही प्रक्रिया व्यवस्थितपणे न केल्यास छान अंकुरित कडधान्याचा आस्वाद घेता येत नाही. अशावेळी स्प्राऊट मेकरचा पर्याय उपयोगी ठरतो.
वापरण्यास अगदी सोपे आणि स्वच्छ करण्यास कोणतीही अडचण येत नाही
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.