esakal | घरातून लढताना... : 'टिकटॉकवर घरबैठोइंडिया'
sakal

बोलून बातमी शोधा

Tik-Tok

या संकटाच्या काळात आपण व आपले कुटुंबीय सुखरूप असाल, अशी आशा आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात बंदिस्त असताना कंटाळा येणं किंवा नैराश्याची भावना मनात डोकावणं साहजिक आहे. पण याच गोष्टीमुळं आपल्याला एरवी वेळ न मिळाल्यामुळं करता येत नसलेल्या गोष्टी, राहून गेलेले जोपासायचे छंद, घरच्यांशी निवांत गप्पा-टप्पा, मनोरंजनाची नवी संधी या सगळ्यासाठी भरपूर वेळ मिळतोय की!

घरातून लढताना... : 'टिकटॉकवर घरबैठोइंडिया'

sakal_logo
By
कुमार सिंग

या संकटाच्या काळात आपण व आपले कुटुंबीय सुखरूप असाल, अशी आशा आहे. लॉकडाऊनमुळे अनेक दिवस घरात बंदिस्त असताना कंटाळा येणं किंवा नैराश्याची भावना मनात डोकावणं साहजिक आहे. पण याच गोष्टीमुळं आपल्याला एरवी वेळ न मिळाल्यामुळं करता येत नसलेल्या गोष्टी, राहून गेलेले जोपासायचे छंद, घरच्यांशी निवांत गप्पा-टप्पा, मनोरंजनाची नवी संधी या सगळ्यासाठी भरपूर वेळ मिळतोय की! या कठीण काळात घरी राहून तुम्हाला मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यही जपावं लागत असणारच.

टिकटॉक परिवारातही ज्या पद्धतीनं या रोगाविरुद्ध लढा देण्यासाठीचं प्रोत्साहन दिलं जातंय, त्याबद्दल आम्हीही भारावून गेलोय. तुम्हालाही टिकटॉक वापरून घरबसल्या काय काय धमाल करता येतं, हे पाहायचं असल्यास घरबैठोइंडिया हा हॅशटॅग वापरा.

याअंतर्गत Explore Under Water, Fight with Virus, Cricket Game आणि Cross The Wall यांसारखे व्हर्च्युअल गेम्स टिकटॉक अॅपवर खेळायला मिळू शकतात. तुमच्या मित्र आणि कुटुंबियांमध्ये या गेम्समुळे मस्त स्पर्धा लागू शकते. याखेरीज शिल्पा शेट्टी, कुणाल खेमू, मोहम्मद शामी, रणविजय सिंग आणि हिना खानसारखे नावाजलेले सेलिब्रिटी घरी बसून काय धमाल करताहेत, हे तुम्हाला टिकटॉकच्या माध्यमातून सांगत आहेत.

असे अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी #घरबैठोइंडिया फॉलो करा. आपल्याला या गेम्सविषयी अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला जरूर कळवा. घरबैठोइंडिया हा हॅशटॅग आतापर्यंत ६.४ अब्ज लोकांनी पाहिला आहे.

loading image
go to top