esakal | ग्रुमिंग + : लेयर्ड नेकलेस
sakal

बोलून बातमी शोधा

Layerd-Neckless

तुमच्या ड्रेसची शोभा अधिक वाढवते ते नेकलेस. कोणत्याही टॉप, ड्रेस आणि आउटफिटवर नेकलेस घातल्याने लुक अधिक सुंदर दिसतो. गळ्यातली लांब चेन किंवा पेंडटसोबतचे गळ्यातले अशीच काहीशी नेकलेस घालण्याची फॅशन आपण आजवर पाहिली. मात्र, एकाच वेळी दोन-तीन गळ्यातले घालण्याची फॅशन आता ट्रेंडमध्ये आहे. जाणून घेऊयात ट्रेंडिगमधील लेर्यड नेकलेसविषयी...

ग्रुमिंग + : लेयर्ड नेकलेस

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

तुमच्या ड्रेसची शोभा अधिक वाढवते ते नेकलेस. कोणत्याही टॉप, ड्रेस आणि आउटफिटवर नेकलेस घातल्याने लुक अधिक सुंदर दिसतो. गळ्यातली लांब चेन किंवा पेंडटसोबतचे गळ्यातले अशीच काहीशी नेकलेस घालण्याची फॅशन आपण आजवर पाहिली. मात्र, एकाच वेळी दोन-तीन गळ्यातले घालण्याची फॅशन आता ट्रेंडमध्ये आहे. जाणून घेऊयात ट्रेंडिगमधील लेर्यड नेकलेसविषयी...

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे लेयर्ड नेकलेस?

  • साधारण नेकलेस एखाद्या चेन आणि पेंडंटसह येते. मग यामध्ये असं काय वेगळं आहे? नेकलेसची संपूर्ण व्याख्या बदलणारे असे हे नेकलेस आहेत. तीन वेगवेगळ्या आकाराची चेन्स एकाच नेकलेसमध्ये असतात. एवढचे काय, तर तिन्ही चेनचे पेंडंटही वेगळे असतात. 
  • लेयर्ड नेकलेसमध्ये असणाऱ्या चेन एका सेटमध्ये येतात किंवा वेगवेगळ्याही मिळतात. 
  • मोठ्या गळ्याच्या कपड्यांसोबत लेयर्ड नेकलेस खूप उठून आणि आकर्षक दिसते. 
  • हे गळ्यातले खूप नाजूक आणि बारीक असते. पारंपरिक आणि वेस्टर्न दोन्ही प्रकारच्या ड्रेसवर घालून शोभा वाढवू शकता.
  • तीनपेक्षा अधिक चेन असणारे लेयर्ड नेकलेस सध्या बाजारात मिळतात. 
  • यामध्ये गोल्ड, सिल्व्हर आणि रोझ गोल्ड हे रंग खूप लोकप्रिय आहेत. 
  • फक्त मोठ्या गळ्याच्या टॉपवरच नाही तर, हॉल्टर, हायनेक आणि टर्टलनेकच्या टॉपवरही हे गळ्यातले उठून दिसते.