किचन + : मॅग्नेटिक नाईफ होल्डर

Knief
Knief
Updated on

स्वयंपाक घरातील किचन ट्रॉली चमचे, भातवाढी आणि विविध आकाराच्या डावांनी गच्च भरलेली असते. त्यातच धारदार चाकूही ठेवले जातात आणि घाईच्या वेळी यामुळेच अपघात होतात. चाकूंसाठी सहज उचलता येईल, पात्याला हात लावायची गरज पडणार नाही अशी वेगळी जागा गरजेची असते. त्यासाठी मॅग्नेटिक नाईफ होल्डर उत्तम पर्याय ठरतो. चाकू या होल्डरवर त्याच्या पात्याच्या मदतीने चिकटत असल्याने त्याच्या हॅंडलला धरून तो ओढून घेणे सोपे व सुरक्षित ठरते. त्यामुळे असा मॅग्नेटिक नाईफ होल्डर तुमच्या किचनचा अविभाज्य भाग असायलाच हवा. 

वैशिष्ट्ये

  • होल्डरवर तीन छोटी छिद्रे असतात. त्यांचा उपयोग करून भिंतीवर किंवा किचन ट्रॉलीच्या आतमध्ये स्क्रूच्या मदतीने सहज बसवता येतो.
  • स्टीलची बॉडी असल्याने गंजत नाही आणि मिरर फिनिश असल्याने आकर्षक दिसतो. 
  • निओडायनिअमचे पॉवरफुल मॅग्नेट तुमचे सर्व चाकू आणि चमच्यासारख्या इतर वस्तू अगदी घट्ट धरून ठेवते आणि ओढल्याशिवाय खाली येत नाही. 
  • किचनबरोबरच ऑफिस, स्टडी रुम, आर्ट आणि क्राफ्ट हाउस आणि बाथरूममधील धातूच्या वस्तू ठेवण्यासाठीही होल्डरचा उपयोग करता येतो.
  • काही कंपन्यांच्या उत्पादनासमवेत मोफत नाईफ शार्पनर उपलब्ध.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com