esakal | ग्रुमिंग + : ऑक्सिडाइज नोजपिन
sakal

बोलून बातमी शोधा

oxidised nose pin

स्त्रिया पूर्वी मोठ्या आकाराची आणि जड वजनाची नथ हौसेने घालत. नऊवारी साडी आणि नथ, हे तर समीकरणच आहे. नथ पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला दागिना आहे. मुलीदेखील आवडीने नाक टोचून घेतात. नाक, कान टोचण्याची फॅशन जुनीच असली, तरी त्यात सतत नवे काही तरी दाखल होत असते.

ग्रुमिंग + : ऑक्सिडाइज नोजपिन

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

स्त्रिया पूर्वी मोठ्या आकाराची आणि जड वजनाची नथ हौसेने घालत. नऊवारी साडी आणि नथ, हे तर समीकरणच आहे. नथ पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये अतिशय नावाजलेला दागिना आहे. मुलीदेखील आवडीने नाक टोचून घेतात. नाक, कान टोचण्याची फॅशन जुनीच असली, तरी त्यात सतत नवे काही तरी दाखल होत असते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोजपिन, कुड्या, मोठ्या चमक्यांची फॅशन पुन्हा एकदा ट्रेंडिंग आहे. सोशल मीडियावर सध्या ‘नथीचा नखरा’ हा ट्रेंडही जोरदार सुरू आहे. नोजपिन म्हणजे नथेचे नवीन व्हर्जनच म्हणायला हवे. तरुण मुलींना नोजपिनने सध्या भुरळ पाडली आहे. त्यामधील ऑक्सिडाइज नोजपिनविषयी जाणून घ्या अधिक माहिती !

1) ऑक्सिडाइज नोजपिन ही पारंपरिक नथीप्रमाणे नाही. तिला थोडासा वेस्टर्न टच आहे. त्यामुळे ती कधीही वापरता येऊ शकते. 

2) चंद्र, गणपती, त्रिशूळ, 
मोर, फूल, कमळ, मासा, पान, हत्ती, बाण या ऑक्सिडाइज नोजपिनमधील काही ट्रेंडिग आणि सर्वाधिक मागणी असलेल्या डिझाइन आहेत.  

3) ऑक्सिडाइज नोजपिनमध्ये खड्यांचे, मोत्यांचे विविध रंग मिळतात.

4) जिन्स, कुर्ती, वनपिसवर वेस्टन वेअरसोबतही उठून दिसते.

5) यातील असणाऱ्या डिझाइन या फक्त पारंपरिक लुकसाठी मर्यादित नाहीत. वेस्टन ड्रेसवरही आता ऑक्सिडाइज नोजपिन वापरता येतात.

6) तुम्ही नाक टोचले नसेल, तरी चिंता नाही. बाजारात प्रेसच्या नोजपिन उपलब्ध आहेत.