जोडी पडद्यावरची : नात्याची ‘जुगलबंदी’

परंपरा ठाकूर-सचेत टंडन
Saturday, 7 November 2020

‘टॉयलेट-एक प्रेमकथा’, ‘साहो’, ‘तान्हाजी’, ‘कबीरसिंग’ अशा चित्रपटांतून आपल्या सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावणारी जोडी म्हणजे संगीत दिग्दर्शक सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर. ‘तनहाई’ या नव्या गाण्यामुळे ही जोडी चर्चेत आहे. सचेत मूळचा लखनौचा, तर परंपरा दिल्लीची. त्यांची पहिली भेट ही सन २०१५ मध्ये ‘द व्हॉइस ऑफ इंडिया’ या रिॲलिटी शोमध्ये झाली.

‘टॉयलेट-एक प्रेमकथा’, ‘साहो’, ‘तान्हाजी’, ‘कबीरसिंग’ अशा चित्रपटांतून आपल्या सुपरहिट गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावणारी जोडी म्हणजे संगीत दिग्दर्शक सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर. ‘तनहाई’ या नव्या गाण्यामुळे ही जोडी चर्चेत आहे. सचेत मूळचा लखनौचा, तर परंपरा दिल्लीची. त्यांची पहिली भेट ही सन २०१५ मध्ये ‘द व्हॉइस ऑफ इंडिया’ या रिॲलिटी शोमध्ये झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्या मैत्रीबद्दल ते म्हणाले, ‘‘संगीत हा दोघांच्याही जिवाभावाचा विषय असल्याने आमची खूप छान गट्टी जमली. त्यातूनच आपण संगीत क्षेत्रात एकत्र मिळून काम केलं, तर आपण छान काहीतरी करू शकू, असा विश्वास आम्हाला वाटला आणि आम्ही सचेत-परंपरा या नावाने संगीत दिग्दर्शन करायला सुरुवात केली. ‘टॉयलेट-एक प्रेमकथा’ हा आम्हा दोघांचा पहिला चित्रपट. आमचं ‘सुबह की ट्रेन’ हे गाणं सगळ्यांना खूप आवडलं आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. त्यानंतर ‘भूमी’, ‘यमला पगला दीवाना फिर से’, ‘बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटांच्या गाण्यांना आम्ही संगीत दिलं. त्यानंतर आला तो ‘कबीरसिंग’- ज्यानं आमचं नाव अनेक लोकांपर्यंत पोचवलं. गेल्या वर्षी ‘साहो’, ‘तान्हाजी’ या चित्रपटांच्या आमच्या गाण्यांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. हे सगळं काम करत असताना तुमच्यातली मैत्रीही तितकीच घट्ट असणं महत्त्वाचं आहे. तसं असलं, की ते तुमच्या कामात उतरतं.’’ 

सचेतच्या स्वभावाबद्दल परंपरा म्हणाली, ‘‘आम्हाला सुरुवातीला थोडा वेळ लागला एकमेकांशी ओळख करून घ्यायला; पण सचेत माणूस म्हणून खूप जेन्युइन आहे, मेहनती आहे, तसाच ठरवलेल्या गोष्टीचा पक्का आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली, की तो ती करतोच. त्याच्यातले हेच गुण मला खूप आवडतात.’’

परंपराबद्दल सचेतनं सांगितलं, ‘‘आमच्यात अनेक गोष्टी कॉमन आहेत, असं म्हणायला हरकत नाही. तिचं डेडिकेशन कमाल आहे. ती फार क्रिएटिव्ह आहे. तिला सतत नवीन नवीन काही ना काही सुचत असतं. तसंच ती खूप समजूतदार आहे, मनमोकळी आहे. याचमुळे आमची मैत्री छान टिकून आहे.’’

‘तनहाई’ या गाण्याविषयी बोलताना सचेत म्हणाला, ‘‘हे आमच्यासाठी खूप खास गाणं आहे. आम्ही जवळपास चार-पाच महिने या गाण्यावर काम करत होतो. हे गाणं टीमवर्कचा उत्तम नमुना आहे. गाण्याची दिग्दर्शिका स्नेहा शेट्टी आणि आपले विचार शब्दात मांडण्याची विलक्षण पद्धत असलेले गीतकार सैद कादरी यांच्याबरोबर काम करण्याची मजा होती. आम्ही अनेक मीटिंग्ज करून, हवा तसा वेळ देऊन हे गाणं तयार केलं आहे.’’

परंपरानं सांगितलं, ‘‘आम्ही संगीत देताना त्या गाण्यासाठी आम्ही स्वतःला संपूर्ण वाहून घेतो. गाण्यातील एक एक धून आम्ही बारकाईनं तयार करतो, ते गाणं छान सजवतो- जेणेकरून ते ऐकायला खूप छान वाटेल. या गाण्यातही आम्ही तेच केलं. हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल, की ते आमच्या आधीच्या गाण्यांपेक्षा खूप वेगळं आहे.’’ हे गाणं तुलसीकुमार हिनं गायलं असून, ते प्रेक्षक पसंतीस उतरलं आहे.
(शब्दांकन - राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article parampara thakur and sachet tondon