किचन + : पास्ता मेकर रोलर मशिन

Pasta
Pasta

मुलांमध्ये गेल्या दोन दशकांपासून नूडल्स खाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. कंपनीचे तयार नूडल्स आणून दोन मिनिटांत पोटभरीचा हा पदार्थ झपाट्याने लोकप्रिय झाला, त्यात नवनवीन फ्लेवर्सही आले. पास्ता हा प्रकारही आता असाच वेगाने रुजतो आहे. करायला सोपा, चवदार, अनेक फ्लेवर्स असल्याने हॉटेलच्या मेन्यूमध्येही त्याला मोठी मागणी असते.

मात्र, लॉकडाउनच्या काळात हे पदार्थ हॉटेलमध्ये जाऊन खाणे कठिण बनले आणि त्याचबरोबर हे पदार्थ घरातच करुन खाण्याचा नवा ट्रेंड सेट झाला! घरात पास्ता किंवा नूडल्स करण्याचे काम तसे किचकट आणि वेळ खाऊ. त्यासाठीचे उपकरणे घरात सहज उपलब्ध नसतात. घरातला सोऱ्या वापरून नुडल्स बनवता येतात, मात्र पास्ता बनवणे कठिणच. त्यासाठी ऑनलाइन मार्केटमध्ये पास्ता मेकर रोलर मशिन सहज उपलब्ध आहे. त्याचा उपयोग करून तुम्ही फ्रेश नूडल्सही बनवू शकता.

असा आहे पास्ता मेकर रोलर मशिन

  • भिजवलेली कणिक मशिनमध्ये घालून हॅंडल फिरवत पास्ता, नूडल्स बनवता येतात.
  • विशिष्ट मेटरिअलपासून बनविलेल्या हॅंडलमुळे रोल करताना हात घसरत नाही.
  • रोलरच्या खाली दिलेल्या क्लॅम्पच्या मदतीने टेबलवर मशिन घट्ट बसवता येतो.
  • मशिनला तीन विविध प्रकारचे ब्लेड लावून आवडणाऱ्या आकाराचे पास्ता बनवता येतात.
  • असे बारा विविध आकाराचे ब्लेड वेगळे विकत घेता येतात, नूडल्ससाठी वेगळे ब्लेड.
  • पास्ताची जाडी बदलण्याची सोयही उपलब्ध.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com