मेमॉयर्स : आईच माझी लाडकी मैत्रीण

पूजा पुरंदरे, अभिनेत्री
Sunday, 31 May 2020

मी लहानपणापासूनच नृत्य अन्‌ कला शिकायला लागले. भरतनाट्यमचे धडे घ्यायला लागले. माझी स्टेजशी पहिली ओळख आईमुळेच झाली. तिची इच्छा होती की मी नृत्य शिकावं, त्यामुळं मी शिकायला सुरवात केली. शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर आई व मी चांगल्या मैत्रिणी झालो. विविध पुस्तकांचे वाचन, जुनी गाणी ऐकणं, आलेल्या अनुभवांच शेअरिंग करण्याची सवय तिच्यामुळेच लागली. त्यामुळं आई, मैत्रीण, गुरू ही नाती नंदिनी पुरंदरे म्हणजेच माझ्या आईमध्ये सापडली. गुलजार हे आईचे आवडते लेखक.

माँ के बारे में क्‍यू लिखू 
माँ ने तो खुद मुझे लिखा है 
खरं तर माझं व्यक्तिमत्त्व आईसारखंच आहे. तिच्यामध्ये असलेले सर्व चांगले गुण माझ्यामध्ये आलेले आहेत. पहिला गुरू ही माझी आईच आहे. तिच्याकडून मी आत्मनिर्भर व्हायला शिकले. ती आमच्या घराची सपोर्ट सिस्टिम आहे. आयुष्यात आपण स्वतःसाठी जगतच असतो; पण कुटुंबीयांसाठी जगण्याचा चांगला गुण तिनं मला शिकविला. माझ्यामध्ये नृत्य अन्‌ अभिनयाची आवड आईकडूनच आलीय. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मी लहानपणापासूनच नृत्य अन्‌ कला शिकायला लागले. भरतनाट्यमचे धडे घ्यायला लागले. माझी स्टेजशी पहिली ओळख आईमुळेच झाली. तिची इच्छा होती की मी नृत्य शिकावं, त्यामुळं मी शिकायला सुरवात केली. शाळेतून कॉलेजमध्ये गेल्यानंतर आई व मी चांगल्या मैत्रिणी झालो. विविध पुस्तकांचे वाचन, जुनी गाणी ऐकणं, आलेल्या अनुभवांच शेअरिंग करण्याची सवय तिच्यामुळेच लागली. त्यामुळं आई, मैत्रीण, गुरू ही नाती नंदिनी पुरंदरे म्हणजेच माझ्या आईमध्ये सापडली. गुलजार हे आईचे आवडते लेखक.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्यांचे अनेक चित्रपट आईनं पाहिले आणि मलाही दाखविले. त्यावेळी लहान असताना मला त्यातलं फारसं लक्षात येत नव्हतं. पण, त्यामुळं साहित्य आणि आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. मला लिखाण करण्याची आणि चांगले विचार करण्याची सवय लागली अन्‌ मी त्याप्रमाणं वागू लागले. 

माझी ‘सुंदर माझं घर’ ही पहिली मालिका सुरू झाली. त्यावेळी आई माझ्याबरोबर पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाली. मी दिवसभर चित्रीकरण करत असताना ती माझी सर्व काळजी घेत असे. तिचा मला खूप सपोर्ट होता अन्‌ तेवढाच विश्‍वासही होता. त्यामुळेच मी मालिका संपल्यानंतर एकटी मुंबईत बिनधास्तपणे राहू लागले. माझ्या कामातून, वागण्यातून, आसण्यातून मी आईला खूप आनंद देणार आहे. तिची स्वप्नं पूर्ण करणार आहे. तिच्या माझ्याकडून असलेल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणार आहे. कारण, ती माझी सर्वांत लाडकी मैत्रीण आहे. खरंतर मी हे केलं तर तिच्या चेहऱ्यावर असणारा आनंद हा मला कुठल्याही पारितोषिकापेक्षाही खूप मोठा असेल. 

सतत काही ना काही करत राहणं, नवीन गोष्टी शिकणं, आत्मसात करणं हे तिचे गुण मला खूप आवडतात. विशेष म्हणजे, या सर्व गोष्टी ती सर्वांपर्यंत पोचविते. तिच्या प्रेमळ स्वभावामुळं आमच्या अवतीभवती माणसांचा प्रेमाचा गोतावळा वाढला आहे. नवीन पिढीसारखी तीही तिच्यामध्ये बदल करून घेत आहे. त्यामुळं माझ्या मित्र-मैत्रिणींना ती आपलीशी वाटते. काळानुरूप बदलायचं हेच तिचे गुण सर्वांना भावतात. 
शब्दांकन - अरुण सुर्वे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article pooja purandare on Mother