esakal | व्हॅलेंटाइन डे विशेष : प्रेम ‘सेलिब्रेट’ करा!
sakal

बोलून बातमी शोधा

prarthana-behere

मला खरंतर व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करावा, असा प्रश्‍न पडतो. यातील बरंचसं सेलिब्रेशन मला कळत नाही, कारण मला नेहमीच वाटतं, की प्रेमाचा एकच दिवस नसावा मात्र, असंही वाटत की एक दिवस असला पाहिजे, ज्या दिवशी आपण एकमेकांबद्दल बोलू शकू, मनमोकळ्यापणाने गप्पा मारू शकू, आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकू आणि  त्यासाठीच ‘व्हॅलेंटाइन डे’ असला पाहिजे. पण, तो मी कसा आणि किती सेलिब्रेट करेल, हे आत्ताच सांगता येणार नाही.

व्हॅलेंटाइन डे विशेष : प्रेम ‘सेलिब्रेट’ करा!

sakal_logo
By
प्रार्थना बेहेरे, अभिनेत्री

मला खरंतर व्हॅलेंटाइन डे कसा साजरा करावा, असा प्रश्‍न पडतो. यातील बरंचसं सेलिब्रेशन मला कळत नाही, कारण मला नेहमीच वाटतं, की प्रेमाचा एकच दिवस नसावा मात्र, असंही वाटत की एक दिवस असला पाहिजे, ज्या दिवशी आपण एकमेकांबद्दल बोलू शकू, मनमोकळ्यापणाने गप्पा मारू शकू, आपल्या मनातील भावना व्यक्त करू शकू आणि  त्यासाठीच ‘व्हॅलेंटाइन डे’ असला पाहिजे. पण, तो मी कसा आणि किती सेलिब्रेट करेल, हे आत्ताच सांगता येणार नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पण, लग्नानंतरचा व्हॅलेंटाइन डे माझ्यासाठी नक्कीच स्पेशल असेल. कारण, मला जो हवा होतो तो जोडीदार मिळाला आहे. त्यामुळं या दिवशी मी नक्कीच काहीतरी करणार आहे. आम्ही एकमेकांना छानसं सरप्राइज देऊ. आमच्यामध्ये प्रेम नेहमीच आहे आणि आम्ही ते प्रत्येक दिवशी व्यक्त करत असतो. ‘व्हॅलेंटाइन डे’च्या आपण ते ठरवून व्यक्त करतो, हेच या दिवसाचं वैशिष्ट्य. प्रेमाला मर्यादा नाहीत आणि हेच या दिवशी अधोरेखित होतं. आम्ही दिवशी आमचा बाहेर कुठंतरी फिरायला जाण्याचा किंवा छानशा हॉटेलमध्ये डिनरला जाण्याचा प्लॅन आहे. 

खरंतर प्रेमाबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे. प्रेम फक्त नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड यांच्यापुरतं मर्यादित नसतं. आपण ते कोणावरही करू शकतो. आपण आपल्या आई-वडिलांबद्दल, बहीण-भावाबद्दलही प्रेम व्यक्त करू शकतो. माझ्या मैत्रिणींवर माझं खूप प्रेम आहे. त्यामुळं त्यांच्याबद्दलही मी प्रेम व्यक्‍त करणार आहे.

विशेष म्हणजे, आमच्या घरी कुत्र्याची दोन पिल्लं आहेत. त्यांच्यावरही माझा खूप जीव आहे. मी त्यांच्याबद्दलही प्रेम व्यक्त करणार आहे. प्रेमाला खरंतर सीमा नसते. आपण एखादी वस्तू, व्यक्ती, निसर्ग वा प्राण्यांवरही प्रेम करू शकतो. त्यातून आपल्याला समाधान मिळतं. मात्र, प्रेम लपवून ठेवू नका. ते व्यक्त करणं, सेलिब्रेट करणं तितकंच गरजेचं आहे. त्यातून आपल्या मनातील भावना व्यक्त होत असतात. आपलं दुसऱ्यावर किती प्रेम आहे, याची जाणीवही समोरच्याला होत असते. त्यामुळं प्रेम हे प्रेम असतं, तुमचं-आमचं सेम असतं, असं म्हटलं जातं ते उगीचच नाही. 
(शब्दांकन - अरुण सुर्वे )

loading image
go to top