सेलिब्रिटी वीकएण्ड : मैत्रिणींबरोबर फूल टू धमाल...!

रिंकू राजगुरू, अभिनेत्री
Friday, 8 May 2020

रिंकू राजगुरू ‘सैराट’ या चित्रपटामुळे घरोघरांत पोचली. तिला खऱ्या अर्थाने स्टारडम प्राप्त झाले. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही येऊ लागल्या. परंतु, त्यातील काही निवडक चित्रपट तिने स्वीकारले. बाकीच्या अनेक स्क्रिप्ट्स तिने नाकारल्या. त्यानंतर दक्षिणेतील चित्रपटसृष्टची सफरही तिने केली. मागील दोनेक वर्षात तिचे ‘कागर’ आणि ‘मेकअप’ हे चित्रपट आले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठीमध्ये असा मजल दरमजल करीत प्रवास सुरू असतानाच आता तिने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. ‘हंड्रेड’ नावाची वेबसिरीज तिने केली आहे. हॉटस्टारवर ती उपलब्ध आहे. रिंकूला तिचा वीकएण्ड कसा असतो असे विचारल्यावर ती म्हणते, ‘‘माझ्यासाठी वीकएण्ड असा काही नसतो. नेहमीच शूटिंग सुरू असते आणि ते नसल्यावर वीकएण्ड! कधी कधी माझे सगळेच दिवस वीकएण्ड असतात. सुट्टी मिळाली, की तो माझा वीकएण्ड असतो. चित्रीकरण सुरू असताना मी कॉलेजला जाऊ शकत नाही, मग कॉलेजच्या मैत्रिणी माझ्या घरी येतात. आम्ही खूप गप्पा मारतो. धमालमस्ती करतो. मैत्रिणी कॉलेजच्या काही गमतीजमती सांगतात आणि मग मी चित्रीकरणाच्या गमतीजमती सांगते. आम्ही एकत्रित बसून वाचनही करतो. विविध विषयांवर गप्पा मारतो आणि एकमेकींच्या विचाराची देवाणघेवाण करतो. मला त्यांच्याबरोबर कॉलेजच्या गप्पा मारताना खूप छान वाटते.

मी कॉलेजला जाऊ शकत नसल्यामुळे माझ्या मैत्रिणी मला आज काय शिकवले, उद्या काय शिकविणार आहेत, हे सांगतात. मैत्रिणी आल्या नाहीत, तर मी कधी कधी चित्रपट पाहते आणि लोकांचे, निसर्गाचे निरीक्षण करते. कारण तो माझ्या अभ्यासाचा विषय आहे. मी घरच्या मंडळींबरोबर कधी फिरायला किंवा जेवायला बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे सुट्टी असली की, घरच्या घरीच राहायचे आणि एन्जॉय करायचे. मी हॉटेलमध्ये सहसा जात नाही, कारण चित्रीकरण असले की बऱ्याच वेळेला बाहेरचे खाणे होते. मात्र, घरी असताना आईच्या हातचेच जेवण मला आवडते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rinku rajguru on friends