ग्रुमिंग + : मेकअपचा डिफरंट लुक...

Makeup
Makeup
Updated on

फॅशन, आउटफिट, स्टाइलसोबतची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘मेकअप’. प्रत्येक मुलीला मेकअप करण्याची आवड असतेच. मेकअप करणं हे काही सोप्पं नाही. काही मुली रोज मेकअप करतात तर, काही खास कार्यक्रमासाठी. आउटफिटप्रमाणे आणि जागेप्रमाणे मेकअपचे प्रकार ठरतात. त्यातील तीन मुख्य प्रकारच्या मेकअपविषयी जाणून घेऊत.

ऑफिस मेकअप 
ऑफिसमधला पेहराव हा फॉर्मल असतो. त्यामुळे भडक आणि जास्त फॅशनेबल प्रकारचे कपडे शक्यतो वापरले जात नाहीत. फॉर्मल लुकसाठी मेकअपही तसाच केला पाहिजे. सध्या ‘न्यूड मेकअप’चा ट्रेंड आहे. लिपस्टिक, नेलपेंट, आयशॅडोचे न्यूड कलर कलेक्शन खूप पसंत केलं जातं. न्यूड कलर म्हणजे मातेरी आणि त्वचेसारखेच रंग. कोणत्याही प्रकारचा भडक रंग त्यामध्ये नसतो. ऑफिससाठी सीसी क्रिमचा वापर करा. काळ्या रंगाचे आयलाइनर लावा. वेगवेगळ्या रंगाचे आयलाइनर सध्या उपलब्ध आहेत. आयलाइनर शार्प किंवा जास्त बोल्ड करू नये. तुम्ही आयलाइनरएवजी काजळही लावू शकता. लिपस्टिकसाठी न्यूड कलर्स किंवा ब्राऊन शेड ट्राय करा.

डेली मेकअप 
रोजच्या रुटीनसाठी मेकअप. रोज तुम्ही वेगवेगळ्या लोकांना भेटत असता आणि अनेक ठिकाणी जाता. अशावेळी थोडासा मेकअप करण्यास काहीच हरकत नाही, मात्र हा मेकअप जास्तही नसावा. त्यासाठी सर्वांत आधी चेहऱ्यावर फाउंडेशन लावा. फाउंडेशन हा तुमच्या मेकअपचा बेस असतो.

फाउंडेशन रोजच्या वापरासाठी नको असल्यास पर्याय म्हणून ‘सीसी क्रीम’, म्हणजे कलर करेक्शन क्रीम. हे रोज ऑफिस किंवा कॉलेजला जाताना लावू शकता. हे क्रीम विना मेकअप तुमच्या चेहऱ्याला नैसर्गिक आणि सुंदर लुक देतं. फाउंडेशन हा मेकअपचा बेस आहे. त्यामुळं तुमच्या स्किन टोनप्रमाणं योग्य शेड निवडा. त्यावर कंसीलर लावा. ते चेहऱ्यावरील डाग, खड्डे, डार्क सर्कल्स, वण्र, पिंपल्स हे सर्व लपवण्यासाठी मदत करते. हलकीशी कॉम्पॅक्ट पावडर लावा. त्यानंतर आयलायनर आणि मस्कारा लावा. लिपस्टीक जास्त गडद नसावी. रोजच्या वापरासाठी तुम्ही न्यूड कलर्स, लाइट पिंक, पिंक, लाइट रेड असे शेड्स वापरु शकता.

ब्राईडल मेकअप 
ब्राईडल म्हणजेच नववधूचा मेकअप. लग्नासाठी प्रत्येक वधूला खास दिसायचं असतं. सर्वांच्या नजरा तिच्यावरच असतात. त्यामुळं मेकअप आणि हेअरस्टाइल लक्षवेधी असली पाहिजे. सहसा हा मेकअप ब्युटी पार्लरमध्येच केला जातो. पण, तुम्ही स्वत:ही तो करू शकता. त्यासाठी आधी तुमच्या आवडीची हेअर स्टाइल निवडा. मेकअपसाठी फाउंडेशन आणि लूज पावडरच्या मदतीने बेस तयार करून घ्या. तुमच्या चेहऱ्यावर डाग असल्यास कंसीलर लावायला विसरू नका. ब्रायडलसाठी आय मेकअप महत्त्वाचा असतो. त्यासाठी तुमच्या साडीचा किंवा लहेंग्याचा रंग लक्षात घेऊनच आयशॅडो लावा. गडद रंग नक्कीच उठून दिसेल. लग्न असल्यानं ग्लीटरचाही वापर करू शकता. आयलायनरही शार्प लावा. नैसर्गिक आयलॅश या दाट नसतात, त्यासाठी खोट्या लावू शकता. लिपस्टिकसाठी पुन्हा साडी किंवा लहंग्याप्रमाणे गडद रंग निवडा. लिपस्टिक लावण्याआधी लिप पेन्सिलने बॉर्डर बनवा. त्यानुसार लिपस्टिक लावा. लाइट्स आणि कॅमेरासमोर उठून दिसण्यासाठी चिकबोन्सला हायलाइट करा. अर्थात, गालाच्या उंचवट्यांना हलकासा गुलाबी रंग देऊन तो ब्रशने फिरवा. आता हायलाइटर ट्यूब सहज मिळते. ते गालावर, नाकाचे फिचर्स हायलाइट करण्यासाठी वापरु शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com