ग्रुमिंग + : मेकअपचा मुखवटा!

ऋतुजा कदम
Sunday, 9 August 2020

मेकअप करणं अजिबात सोपं काम नाही. त्यासाठी आवड असणं गरजेचं आहे, कारण ती एक कला आहे. त्यामध्ये काहीतरी सतत नवीन आणण्याचं काम नेटिझन्स करत असतात. याचनिमित्तानं सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट ट्रेंड सुरू आहे. ‘इल्युजन मेकअप’ म्हणजेच थ्रीडी पद्धतीचा भ्रम देणारा मेकअप असा हा ट्रेंड आहे.

मेकअप करणं अजिबात सोपं काम नाही. त्यासाठी आवड असणं गरजेचं आहे, कारण ती एक कला आहे. त्यामध्ये काहीतरी सतत नवीन आणण्याचं काम नेटिझन्स करत असतात. याचनिमित्तानं सोशल मीडियावर सध्या एक भन्नाट ट्रेंड सुरू आहे. ‘इल्युजन मेकअप’ म्हणजेच थ्रीडी पद्धतीचा भ्रम देणारा मेकअप असा हा ट्रेंड आहे. यामध्ये अनेक प्रकार आहेत आणि तो मेकअप आहे, यावर विश्‍वास ठेवणं किंचित अवघडच वाटेल. त्यामधील इल्युजन मेकअप मास्क हा प्रकार चांगला गाजतो आहे. जाणून घेऊ या मेकअपविषयी माहिती आणि तो कसा करावा. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काय आहे इल्युजन मेकअप मास्क

  • इल्युजन म्हणजेच डोळ्यांना चकवा देणारा भ्रम आहे. चेहऱ्यावरील मुखवटा हा मेकअपच्या साहाय्यानं तयार केला जातो. परंतु, मेकअपच्या कलेनं आणि कौशल्यानं एका चेहऱ्यावर जणू दुसरा मुखवटा लावला आहे, हे भासवतो. चेहऱ्याचा एक भाग मेकअपचा मुखवटा आणि दुसरा भाग हा साधा चेहरा असं त्याचं स्वरूप असतं. 
  • हा मास्क तयार करण्यासाठी तुम्ही नेहमी ज्या पद्धतीनं मेकअप करता,. तो करावा. मुखवट्याचा मुख्य भाग आहे, ती म्हणजे कडा. काळ्या रंगानं ही कडा आखावी. 
  • मानेचा आणि कपाळाचा काही भाग काळ्या रंगानं सावलीसारखा रेखाटून घ्यावा.
  • मुखवटा सोडून राहिलेल्या चेहऱ्याच्या भागावरील मेकअप हा शक्यतो कमी किंवा काढून टाकावा. जेणेकरून मेकअप केलेला भाग उठून दिसंल आणि मुखवट्याचा लुक देईल.
  • मुखवटा आणि चेहऱ्याला जोडणारा दोरा काढायला विसरू नका. तो मुखवटा खरा असल्याचं भासवतो. हा मेकअप नक्कीच सोपा नाही, मात्र प्रयत्न करून हा लुक मिळवता येईल. शिवाय, सध्या इल्युजन मेकअप मास्क ट्रेंडिगमध्ये असल्यानं एकदा तरी ट्राय नक्कीच करावे!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article rutuja kadam on makeup mask