फॅशन + : स्पेशल ब्रायडल कलेक्शन

Fashion
Fashion

उन्हाळा आणि लग्न हे कॉम्बिनेशन नवीन नाही. बदलत्या काळानुसार, फॅशन आणि ग्राहकांच्या मागणीनुसार सीझन आणि लग्नासाठी नवनवीन कलेक्शन बाजारात येतात. उन्हाळ्याचा विचार करता लग्नासाठी खास कलेक्शन, मटेरिअल आणि रंग निवडणे कठीण होते. ग्राहकांची मागणी आणि आत्ताचा ट्रेंड लक्षात घेता पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या ‘हस्तकला’ शोरूमने हटके कलेक्शन आणले आहे. नारायण पेठ, हडपसर, पिंपरी-चिंचवड येथील हस्तकला शोरूममध्ये उन्हाळ्यातील लग्नासाठी खास कोणते कलेक्शन आहे, याची माहिती यातून जाणून घेणार आहोत.

साडी -
सध्याचा ट्रेंड लक्षात घेता, नवीन जोडप्यांची मागणी ही डिझायनर कलेक्शनला असते. आत्ताच्या मुलींची बॉर्डर असलेल्या आणि डिझायनर साड्यांची मागणी असते. त्यामुळे मुलींची आवड आणि मागणी ही डिझायनरी एम्ब्रॉयडरी साडीसाठी असते. आधी जॉर्जेट आणि शिफॉन साड्यांची मागणी भरपूर होती. आता त्याची जागा आयात केलेल्या फॅब्रिक्सने घेतली आहे. त्यावर डिझाइन केलेल्या साड्या हस्तकलामध्ये उपलब्ध आहेत. घरातील मोठ्यांची मागणी मात्र अजूनही पारंपरिक पैठणीलाच आहे. त्यामध्येही अनेक पर्याय हस्तकलेमध्ये पाहायला मिळतात. साडीमध्ये गढवाल, कांजीवरम, महाराजा पैठणी, डिझायनर साडी, क्रेप सिल्क, ब्रॉकेट सिल्क असे भन्नाट कलेक्शन पाहायला मिळते. लग्नामध्ये आहेराला किंवा देण्याच्या साड्याही उपलब्ध आहेत. साड्यांमध्ये अनेकांची पसंती चमकदार लुकला असते. जरीचे काम असलेल्या पैठणींना ते प्राधान्य देतात. जास्त भरीवकाम नसलेली, साधी तरीही उठून दिसणारी साडीही अनेकांची स्टाइल आहेच. डिझायनर रितू कुमार स्टाइल असलेली अशी साडीही हस्तकलामध्ये उपलब्ध आहे.

घागरा - 
साड्याइतकीच घागऱ्याला पसंती आहे. त्यामध्ये सतत काहीतरी नवीन स्टाईल बाजारात येत असते. पैठणी बॉर्डर असलेल्या घागऱ्याची मागणी आणि पसंती आहे. बनारसमध्ये २५ वर्षांपूर्वी ‘वल्कलम’ साडीचा प्रकार होता. हाताने केलेले नक्षीकाम त्यावर असे. हे काम खूपच अवघड आहे. आता घागऱ्यामध्ये या वल्कलम साडीचा नवा प्रकार पाहायला मिळतो. घागऱ्याला असणाऱ्या प्लिट्स या वल्कलम फॅब्रिकने बनवून त्याचा घागरा तयार केला जातो. सध्या ट्रेंडमध्ये असलेला हा प्रकार हस्तकलामध्ये उपलब्ध आहे. संपूर्ण घागऱ्याला असणाऱ्या रंगापेक्षा वेगळ्या व्हायब्रंट रंगाची बॉर्डर असलेला घागराही या कलेक्शनमध्ये आहे. 

ड्रेस - 
ऐतिहासिक चित्रपटांमुळे ड्रेसची परिभाषा बदलते आहे. ड्रेस हा प्रकारच मुळात पारंपरिक आहे; पण त्यामध्येही आता इंडो-वेस्टर्न लूक पाहायला मिळतात. ऐतिहासिक चित्रपटांतील काही ड्रेसपासून प्रेरणा घेत मुली लग्नासाठी त्या प्रकारची मागणी करीत आहेत. ‘बाजारीव मस्तानी’, ‘तान्हाजी’, ‘पद्मावत’ अशा काही सिनेमांत वापरल्या गेलेल्या रॉयल ड्रेसची पसंती भरपूर आहे. घागरा, घेर असलेला टॉप आणि त्यावर रॉयल लूक देणारे मोठे जॅकेट ही फॅशन आहे. डिझाइनने भरपूर असलेले हे ड्रेस फक्त भरीवच नाही, तर त्याला वापरण्यात आलेले ब्रॉकेड कापडही तितकेच उठून दिसणारे आहे. या ट्रेंडी स्टाइलचे ड्रेस हस्तकला तुमच्यासाठी घेऊन आले आहे. 

रंग -
सध्याचा ट्रेंड पाहता लोक पारंपरिक रंगांपासून दूर जाताना दिसतात. नवे रंग ते ट्राय करतात. त्यामुळे लग्नात वापरले जाणारे पारंपरिक लाल, गुलाबी, केशरी अशा रंगांपेक्षा वेगळ्या रंगांना ग्राहक पसंती देत आहेत. उन्हाळा सुरू झाल्याने पिच, एप्रिकोट (जर्दाळू रंग), राखाडी, मस्टर्ड, हिरवा, मिंट कलर अशा काही रंगांना मागणी आहे. अशा नवीन आणि अनोख्या रंगाच्या साड्या व घागरे हस्तकलामध्ये पाहायला मिळतात. लग्न समारंभ कोणत्या वेळी पार पडणार आहे, यावरही कपड्यांचे रंग निवडले जातात. त्यामुळे सकाळी लग्न असल्यास ग्राहकांची मागणी ही पेस्टल कलर (हलके रंग), गुलाबी, पिस्ता, निळा असे रंग वापरले जातात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com