डेली सोप : वेबसिरिजच्या दुनियेत!

webseries
webseries

टेलिव्हिजननंतर आता इंटरनेटचं वर्चस्व वाढलं असल्यामुळं मनोरंजनाच्या व्याख्येचं स्वरूपही बदलत आहे. वेबसिरीज हा प्रकार आता भारतामध्ये चांगलाच रुचला आहे. लॉकडाउनमुळं सर्वजण घरातच आहे. वेळच वेळ असताना अनेक जणांनी ‘बिंज वॉच’ करण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळं Over the top (OTT) व्यासपीठावरील नेटफ्लिक्स, हॉटस्टारसारखे, वूट, झी ५, अमेझॉन प्राईम ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रिमिंग अॅप्स सध्या अव्वल स्थानावर आहेत. लॉकडानच्या काळात सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या आणि ट्रेंडिंगमध्ये असलेल्या काही वेबसिरिजचा आढावा आपण घेऊया. 

भारतात OTT प्लॅटफॉर्म सुरू झाल्यानंतर हळूहळू आंतरराष्ट्रीय पातळीचे अॅप्सही येऊ लागले. भारतात २०१६मध्ये नेटफ्लिक्स आलं आणि ते मोठ्या प्रमाणात पाहिलं जातंय. भारतात सध्या वूट, अल्ट बालाजी, बिग फ्लिक्स, अॅमेझॉन प्राईम, वियू, झी ५, हॉटस्टार, नेटफ्लिक्स, MX प्लेअर, डिझनी प्लस अशी काही अॅप्स सुरू आहेत. इतरवेळी एखादी चांगली वेबसिरिज प्रदर्शित झाल्यावर त्याची नेटकऱ्यांमध्ये भरपूर चर्चा असते. सध्या संपूर्ण इंटरनेट अॅक्टिव्ह असल्यानं काही चांगल्या सिरिजना नेटकऱ्यांनी डोक्यावर घेतलं आहे.

‘मनी हायेस्ट’या नेटफ्लिक्सवरील वेब सिरिजचं नाव आतापर्यंत तुमच्या कानावर पडलंच असेल. मूळच्या स्पॅनिश असलेल्या या सिरिजचं खरं नाव ‘la casa de papel’ आहे. लॉकडाउनच्या काळातच याचा चौथा सीझन आला आणि याचनिमित्तानं मोठा प्रेक्षकवर्ग त्याला लाभला. ती २०१७ मध्ये स्पॅनिश भाषेत प्रदर्शित झाली. नेटफ्लिक्सवरील ‘मनी हाइस्ट - द फिनोमिना’ या डॉक्युमेंटरीमध्ये सांगण्यात आल्याप्रमाणं खरंतर ही सिरिज अयशस्वी ठरली होती. सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र हळूहळू त्यात घसरण होऊ लागली. दुसऱ्या सीझननंतर निर्मात्यांनी सिरिज बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर नेटफ्लिक्सने त्याचे कॉपीराईट्स विकत घेऊन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. एकूण चार सीझन आले असून, नुकत्याच आलेल्या चौथ्या सीझनला चांगला प्रतिसाद मिळाला. 

एक प्रोफेसर आहे, जो बऱ्‍यापैकी कट्टर आणि बुद्धिमान आहे. त्यानं एक टीम तयार केली आहे. संघातील सदस्यांची नावं काही शहरावर आधारित आहेत. जसं की, टोकियो, रिओ, मॉस्को आणि लिस्बन इ. वडिलांच्या आठवणीत आणि सरकारच्या प्रतिकारात पहिल्या ‘रॉयल ​​पुदीना’ची दरोडेखोर प्रोफेसर करतात. आता त्याला आपल्या भावाच्या आठवणीत ‘बँक ऑफ स्पेन’ लुटण्याची इच्छा आहे. स्पेनची सर्वांत मोठा सोन्याचा साठा ‘बँक ऑफ स्पेन’मध्ये आहे. चोरीच्या भोवती फिरणारी ही कथा आहे. याशिवाय नेटफ्लिक्सवर सध्या टू हॉट टू हॅंडल, डार्क, शी, फ्रेंड्स, हसमुख, जमतारा, वल्ड फेमस लव्हर या काही सिरिज आणि सिनेमे ‘टॉप १०’च्या ट्रेंडिगमध्ये आहेत. नुकतीच प्रदर्शित झालेली सिरिज ‘हसमुख’ही कॉमेडी आहे. या सिरीजच्या निमित्ताने वीर दास पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सर्वांत चर्चा आहे ती ‘फोर मोअर शॉर्टस प्लीज’ या वेबसिरीजची. याचा दुसरा सीझन नुकताच अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. पहिल्या भागापेक्षा दुसऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

चार मैत्रिणींच्या आयुष्यातील घटना, करिअर, लग्न, प्रेम आणि अनेक बोल्ड विषय यामध्ये हाताळले गेले आहेत. अनेकजण याची तुलना प्रसिद्ध ‘सेक्स अॅण्ड सिटी’ या अमेरिकन रोमॅंटिक, कॉमेडी सिनेमाशी करत आहेत. मात्र, दोन्हींच्या कथा वेगळ्या आहेत. सध्या ‘सेक्स अॅण्ड सिटी’या सिनेमा सिरिजच्या रूपामध्ये डिझनी प्लस यावर सुरू आहे. सध्या भारतातील इतर अॅप्सना डिझनी प्लस चांगलीच टक्कर देत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com