esakal | किचन + : सिलिकॉन बेकिंग कप
sakal

बोलून बातमी शोधा

silicone baking cups

लॉकडाउनच्या काळात लोकांचे स्वयंपाकघरातील प्रयोग वाढले आहेत. मागील भागात आपण आता बेकरीचे पदार्थही किती सहजपणे बनवले जात आहेत, हे पाहिले. त्यात ब्रेडपासून कुकीजपर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी बनवताना त्यांचे प्रेझेंटेशनही महत्त्वाचे असते व त्यासाठी पदार्थ बनविण्यासाठीची उपकरणे अद्ययावत असणे गरजेचे असते. केक हा असाच पदार्थ. त्याच्या आकार व टेक्श्‍चर उत्तम जमून आल्यास तो प्रेझेंटेबल होतो आणि खातानाही मजा येते.

किचन + : सिलिकॉन बेकिंग कप

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लॉकडाउनच्या काळात लोकांचे स्वयंपाकघरातील प्रयोग वाढले आहेत. मागील भागात आपण आता बेकरीचे पदार्थही किती सहजपणे बनवले जात आहेत, हे पाहिले. त्यात ब्रेडपासून कुकीजपर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश होतो. या गोष्टी बनवताना त्यांचे प्रेझेंटेशनही महत्त्वाचे असते व त्यासाठी पदार्थ बनविण्यासाठीची उपकरणे अद्ययावत असणे गरजेचे असते. केक हा असाच पदार्थ. त्याच्या आकार व टेक्श्‍चर उत्तम जमून आल्यास तो प्रेझेंटेबल होतो आणि खातानाही मजा येते. हल्ली केकचे बॅटर घरातच बनवून छानपैकी कपकेक, मफिन ब्रेड केक बनवले जातात. कपकेक घरातील कोणत्याही कपमध्ये बनवण्यापेक्षा ते बाजारात मिळणाऱ्या सिलिकॉन बेकिंग कपमध्ये बनवल्यास ते आकर्षक होतात व न चिकटता बाहेर काढणेही सोपे जाते. आकर्षक आकार व रंगात उपलब्ध असलेल्या या बेकिंग कपांमध्ये तुम्ही कपकेकबरोबरच अंड्यांचे विविध प्रकारही बनवू शकता.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैशिष्ट्ये

  • नॉनस्टिक असल्याने केक चिकटत अथवा 
  • जळत नाही. कोणताही वास येत नाही. 
  • ४० ते २६० अंश फॅरेनाइट तापामानाला काम करतात. 
  • या कपात बर्फापासूनचे विविध पदार्थ बनविणेही शक्य.
  • मायक्रोव्हेह, फ्रिजर आणि स्टीमरमध्येही वापरता येतात.
  • साफ करायला सोपो, डिशवॉशर सेफ.
  • सहा कपांच्या सेटमध्ये उपलब्ध.
loading image
go to top