मेमॉयर्स : आईच माझी आदर्श

Suvarna-Kale
Suvarna-Kale

प्रत्येकाला आपल्या आईविषयी प्रेम असतं. मला असं वाटतं की, माझी आई खूपच बेस्ट आणि आयडियल आहे. आज मी जे काही आहे, ते केवळ तिच्यामुळंच. स्त्री कशी असावी, याचं उदाहरण म्हणजे माझी आई. मला आठवतंय, ज्यावेळी माझ्या वडिलांची कंपनी बंद पडली होती, त्यावेळी आईनं त्यांना खंबीरपणे साथ दिली. त्यावेळी माझ्या भावाचं व बहिणीचं शिक्षण सुरू होतं. त्यावेळी ती कष्ट करण्यात कुठंही कमी पडली नाही. कधीही भाजी आणण्यासाठी घराबाहेर न पडणारी आई भाजी विकायला बसली. पडंल ते कामं केलं. पण, कुटुंबाची घडी विस्कळित होऊ दिली नाही. खरंतर तिच्यामध्ये लीडरशिप करण्याचा गुण आहे. कुठल्या परिस्थितीत कसं वागावं अन् कोणता निर्णय घ्यावा, हे तिला तत्काळ कळतं. त्यामुळं ती आज महिलामंडळ, बचतगट आणि सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभागी आहे. 

खरंतर मला लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. मात्र, आमच्या घराण्यात नृत्य व अभिनय क्षेत्रामध्ये कोणीही नव्हतं. पण, तिनं सर्वांचा विरोध पत्करून माझी नृत्याची आवड जोपासली. त्यासाठी मला कथकचं प्रशिक्षण घेण्यास पाठविलं. स्वच्छंद पद्धतीनं कसं जगायचं, हे तिनं आम्हाला शिकविलं. जे करते ते मनापासून कर, असा सल्लाच तिनं मला दिला. त्यामुळंच मी लावणी, नृत्य अन स्टेज शोमध्ये पुढं आले. तिनं आम्हा सर्व भावंडांनातिनं शिकविलं. मी नृत्य आणि अभिनयाची आवड जोपासून इंजिनिअर झाले.

दोन बहिणी शिक्षिका झाल्या, तर भावानं इंजिनिअरिंग आणि एमबीए केलं. हे सर्व काही आमच्या पाठीशी असणाऱ्या आई-वडिलांच्या पाठिंब्यामुळंच शक्‍य झालं. प्रत्येकाकडं पद आणि इमेज असावी, असं तिचं म्हणणं. त्यामुळं आम्ही तिच्या संस्कारातून मोठे झालो. 

आमच्या कुटुंबात मी सर्वांत लहान. त्यामुळं माझ्यावर सर्वांचाच जीव. मी आईबरोबर आनंद अन् दुःखाच्या सर्वच गोष्टी शेअर करते. तणावात असताना तिच्या मांडीवर झोपते. त्यावेळी मला खूप बरं वाटतं. भविष्यात मला आईसारखं बनावं असंच वाटतं. आईच्या प्रेमापोटी मी हातावर ‘आई’ नावाचा टॅटू काढला आहे. तसेच, आईचा ५०वा वाढदिवसही साजरा केला. विशेष म्हणजे, आम्ही भावंडांनी तीन जून रोजी आई-बाबांचं लग्न पुन्हा लावलं अन् ते क्षण डोळ्यांमध्ये कायमस्वरूपी जपून ठेवले आहेत... कधीही न विसरण्यासाठी.... 
(शब्दांकन - अरुण सुर्वे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com