फॅशन + : ब्लेझर आणि ब्लेझर ड्रेस

सुवर्णा येनपुरे-कामठे
Sunday, 22 March 2020

ब्लेझर घालण्याची इच्छा ज्यांना पूर्ण करता येत नाही, अशांसाठी ब्लेझर ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी वनपिस घालत असल्यास ब्लेझर ड्रेसचा विचार कॅज्युअल वेअर म्हणून करू शकता.

ब्लेझर ड्रेस

 • ब्लेझर घालण्याची इच्छा ज्यांना पूर्ण करता येत नाही, अशांसाठी ब्लेझर ड्रेस हा उत्तम पर्याय आहे. तुम्ही कामाच्या ठिकाणी वनपिस घालत असल्यास ब्लेझर ड्रेसचा विचार कॅज्युअल वेअर म्हणून करू शकता.
 • ब्लेझर ड्रेस हा वनपिस असल्याने त्याला दुसरी कशाची जोड लागत नाही. ब्लेझर ड्रेसमध्ये ड्रेसची नेक ब्लेझर स्टाइल असते. काही ड्रेसमध्ये बटण व हाताची स्टाइलही ब्लेझरसारखीच असते. 
 • या ड्रेसवर केस सुटे ठेवू शकता. हेअरस्टाइल हा पर्यायही तुमच्यासाठी खुला राहतो.
 • ब्लेझर ड्रेस हा वनपिस असल्याने वनपिसचे असंख्य पर्याय तुमच्यासाठी खुले असतात. लांब कानातले, गळ्यात लेअर असलेली चेनची पेंडंट ज्वेलरी, हातात ब्रेसलेट व छोटी पर्स शोभून दिसते. 
 • ब्लेझर ड्रेसमध्ये पार्टीवेअर ड्रेसही मिळत असल्याने तुम्ही थोडा बोल्ड मेकअप करू शकता. 
 • हाय हिल सॅण्डल, स्नीकर शोभून दिसतात.
 • रंग आणि डिझाइनचे असंख्य पर्याय उपलब्ध.

ब्लेझर

 • ब्लेझर घालायची संधी मिळणे, हे प्रत्येकच मुलीला आवडते. मीटिंग, प्रेंझेटेशन, वर्कशॉप, तसेच वक्ता म्हणून काम करीत असल्यास ब्लेझर तुम्हाला प्रोफेशनल बनवण्यास मदत करते.
 • स्कर्ट किंवा ट्राउझरवर ब्लेझर घालू शकता. ट्राउझर किंवा स्कर्ट नसल्यास जीन्सवरही ब्लेझर घालू शकता. ब्लेझर आणि जीन्सचा रंग आसपासच हवा. 
 • यावर पोनीटेल किंवा सुटे सोडलेले केस छान दिसतात. इतर हेअर स्टाइल करू शकत नाही.
 • ब्लेझर हा प्रकार फॉर्मल वेअरमध्ये मोडत असल्याने यावर कोणतीही हेवी ज्वेलरी घालू शकत नाही. कानात टॉप्स घालावेत. हातातले घड्याळ दिसून येत नाही, मात्र पट्ट्याचे (चेनचे नव्हे) घड्याळ घातल्यास अधिक उठून दिसते.
 • शक्यतो न्यूड मेकअप असावा. लिपस्टिकचा हलकासा डार्क शेड लावू शकता, पण फार भडक शेड्स लावू नयेत.
 • हाय हिल्स शोभून दिसतात.
 • रंगाचे मोजकेच पर्याय उपलब्ध.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article suvarna yenpure kamathe on fashion

Tags
टॉपिकस
Topic Tags: