Women's Day : या संशोधनांनी बदललं ‘ती’चं आयुष्य

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 8 March 2020

ग्रामीण भागातील कोट्यवधी महिला, मुलींना दूरवरून पाणी आणावे लागते. कष्टाबरोबरच यामुळे हिंसाचाराचा वाढीव धोका असतो. तसेच नोकरी, शाळा, विश्रांती, खेळ यासाठी वेळ मिळत नाही. हा ताण कमी करण्यासाठी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दोन दक्षिण आफ्रिकेने ॲक्वा रोलरचा शोध लावला, त्याला आता हिप्पो रोलर म्हणून ओळखले जाते.

गेली अनेक शतके महिला सबलीकरणासाठी प्रयत्न होत आहे. या पाच ‘इनोव्हेशन्स’मुळे महिलांची प्रतिष्ठा, आत्मसन्मान वाढण्यास मदत झाली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

1) हिप्पो रोलर -
ग्रामीण भागातील कोट्यवधी महिला, मुलींना दूरवरून पाणी आणावे लागते. कष्टाबरोबरच यामुळे हिंसाचाराचा वाढीव धोका असतो. तसेच नोकरी, शाळा, विश्रांती, खेळ यासाठी वेळ मिळत नाही. हा ताण कमी करण्यासाठी १९९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात दोन दक्षिण आफ्रिकेने ॲक्वा रोलरचा शोध लावला, त्याला आता हिप्पो रोलर म्हणून ओळखले जाते.

 • पोर्टेबल बॅरलच्या आकाराचा ड्रम कंटेनर.
 • हिप्पो रोलर बादलीपेक्षा पाचपट जास्त पाणी वाहू शकतो.
 • या शोधामुळे २० पेक्षा जास्त देशांमधील लक्षावधी महिलांचे जीवन बदलले आहे.

2) इंटरनेट -
प्रिंटर, रेडिओ, टेलिव्हिजन आणि फोनप्रमाणेच इंटरनेटमुळे महिलांच्या जीवनात क्रांती घडली आहे. अर्थांत इंटरनेटचीही गडद बाजू आहे. त्यामुळे याकडे सावधपणे लक्ष देणे गरजेचे.

 • महिला हक्कांच्या प्रश्नांविषयी जागरूकता होत आहे. 
 • गुंतवणुकीचे स्त्रोत आणि महिलांना व्यवसायातील संधी निर्माण होत आहेत. 
 • #MeToo ते #NiUnaMenos ते #TimesUp याद्वारे सोशल मीडियावरील चळवळींमध्ये लैंगिक असमानता आणि महिलांवरील हिंसा उघडकीस आल्या आहेत.

3) सायकल -
सायकलीने महिलांना हालचालींचे नवस्वातंत्र्य दिले. आजची सायकल ब्रिटिश इंजिनिअरने १८८० मध्ये निर्माण केली. त्याआधी सायकलचे पुढील चाक मोठे आणि मागील लहान असल्याने ही सुधारणा करण्यात आली. या सायकलने महिलांना स्वातंत्र्य दिले. 

 • १८९४  मध्ये महिलेने सर्वप्रथम सायकलवरून प्रवास केला. 
 • महिलांना कॅरेज किंवा इतर आधाराशिवाय सायकल चालविणे शक्‍य झाले. 
 • सायकलमुळे महिलांना वैद्यकीय समस्या निर्माण होतात, विशेषत: त्यांच्या रंगरूपावर परिणाम होऊ शकतो, हा गैरसमज दूर होताच सायकल लोकप्रिय झाली. 

महिलांविषयीचे आणखी विषय वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

4) सॅनिटरी पॅड -
पूर्वी महिलांना मासिक पाळीदरम्यान वृत्तपत्रे, लोकर, जुने कपडे वापरावे लागत होते. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी फ्रान्समधील परिचारकांनी पहिल्या डिस्पोजेबल सॅनिटरी पॅडची निर्मिती केली. जखमी जवानांमधील रक्तस्राव थांबविण्यासाठी हे निर्माण करण्यात आले, हे विशेष. सॅनिटरी पॅडमुळे महिलांचे आरोग्य आणि समाजातील सहभाग सुधारला. 

 • काही दशकानंतर महिलांना वापरण्यास सुलभ, परवडण्याजोगे पॅड बनविण्यात आले. 
 • या क्रांतिकारक शोधाने महिला आणि मुलींची स्वच्छता, आरोग्य, शाळेतील उपस्थिती सुधारली. 
 • आजही गरीब महिलांना या मूलभूत गरजेपासून वंचित राहावे लागते. 

5) लेडीज पॅंट्‌स -
गुलाबी टोप्यांपासून पॅंटपर्यंतच्या विविध कपड्यांनी लिंग समानतेच्या साचेबद्ध कल्पनांना आव्हान दिले. पॅंटमधील उत्क्रांतीने फॅशन, लिंगभेद, स्त्रीत्व एकमेकांचे अविभाज्य घटक असल्याचे अधोरेखित केले. 

 • फ्रान्स युद्धाची नायिका जोन ऑक आर्कला पुरुषांचे कपडे परिधान केल्यामुळे इ.स. १४३१ मध्ये संपविण्यात आले. 
 • महिलांना १९ व्या शतकात बॅगी पॅंट्‌स घातल्याबद्दलही संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.  
 • पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धात पुरुषांची पारंपरिक कामे करावी लागल्याने महिलांनी पॅंट परिधान केली.

महिलांसाठीच्या विविध कोर्सेसची माहिती घेण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article on These researches changed her life