
नितीनला गेल्या काही महिन्यांपासून अनिकेतमधील वागणे खटकत होते. परंतु, सध्याच्या सामाजिक परिवर्तनाचा हा परिणाम असावा म्हणून त्याने काही काळ दुर्लक्ष केले. मात्र, गेल्या महिनाभरापासून अनिकेत घरातील प्रत्येक बाबतीतच चिडचिड आणि आक्रस्ताळेपणा करायला लागला होता. आता मात्र हे प्रकरण जरा हाताबाहेर जात असल्याची जाणीव नितीनला झाली.
नितीनला गेल्या काही महिन्यांपासून अनिकेतमधील वागणे खटकत होते. परंतु, सध्याच्या सामाजिक परिवर्तनाचा हा परिणाम असावा म्हणून त्याने काही काळ दुर्लक्ष केले. मात्र, गेल्या महिनाभरापासून अनिकेत घरातील प्रत्येक बाबतीतच चिडचिड आणि आक्रस्ताळेपणा करायला लागला होता. आता मात्र हे प्रकरण जरा हाताबाहेर जात असल्याची जाणीव नितीनला झाली. परंतु, कोणाशी बोलावे, याचा काहीच उलगडा नितीनला होत नव्हता. अनिकेत किशोरवयीन असला, तरी त्याला चांगली समज होती. त्याने बाबांना म्हणजे अनिकेतच्या आजोबांना फोन लावला. या प्रश्नाचे उत्तर बाबांकडे निश्चित असणार, याची त्याला खात्री होती. बाबांना फोनवर सर्व समस्या सांगितल्यावर ते हसत म्हणाले, ‘‘काय नितीन, अरे किती सामान्य प्रश्न आहे. अनिकेतला कंटाळा आला असेल तर माझ्याकडे दापोलीला पाठव. मी पाहतो.’’ त्यावर नितीन म्हणाला, ‘‘बाबा तसे नाही, काय समस्या हे मला समजून घेऊन ती सोडवायची आहे. तुम्ही मदत करा.’
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
समजावणीच्या सुरात बाबा म्हणाले, ‘‘अरे नितीन, तुम्ही समजता त्यापेक्षा अनिकेतची पिढी खूपच पुढची आहे. तिला समजून घेताना त्या वयात जायला पाहिजे. समाजपरिवर्तनाच्या लाटेत तंत्रज्ञानाचा अतिरेकी आणि अयोग्य वापराचाही यात वाटा आहेच. सिनेमा, टीव्ही, इंटरनेटवरील हिंसेचं, लैंगिकतेचं अनिर्बंध उदात्तीकरण, आक्रमक आणि हिंसेच्या भावनेला खत पाणी घालणारे, मुलांना उत्तेजित करणारे व्हिडिओ गेम्स, आजूबाजूला फोफावत चाललेला चंगळवाद या सगळ्याचाच असं घडण्यात वाटा आहे. आपण ती समजून घेतली पाहिजेत. समाजातील सगळ्या अस्वस्थतेमुळे मुलांमधील नकारात्मक वृत्ती निर्माण झालीय. मुलांना या वयातच समजून घ्यायचे असते. आपला अनिकेत तर हे निश्चित समजून घेईल, अशी मला खात्री आहे. फार काळजी करू नकोस. याची काही कारण मी सांगतो त्यावर शांतपणे विचार कर.
‘बाबा तुमच्याशी बोलून खरंच मन हलकं झालं. आता मीच त्याचा मित्र होतो आणि समस्या दूर करतो. आणि हो तुम्ही म्हणाल्याप्रमाणं त्याला बदल म्हणून दहा-पंधरा दिवसांसाठी दापोलीला पाठवतो. शक्य झाले तर मी पण येतो,’’ नितीन म्हणाला.
Edited By - Prashant Patil