जोडी पडद्यावरची : कामावरच्या निष्ठेमुळे मैत्रीला बळ

चिन्मय उदगीरकर आणि प्रीतम कागणे
Saturday, 5 December 2020

जवळपास आठ-नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर चित्रपटांच्या रिलीजला सुरुवात झाली आहे. ‘वाजवूया बँड बाजा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील आहेत. चिन्मय उदगीरकर आणि प्रीतम कागणे या चित्रपटात महत्त्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चिन्मय आणि प्रीतम या दोघांनीही यापूर्वी एकमेकांचे काम पाहिले होते; परंतु त्यांची पहिली भेट झाली ती या चित्रपटाच्या सेटवर.

जवळपास आठ-नऊ महिन्यांच्या कालावधीनंतर चित्रपटांच्या रिलीजला सुरुवात झाली आहे. ‘वाजवूया बँड बाजा’ हा चित्रपट लवकरच रिलीज होत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवाजी लोटन पाटील आहेत. चिन्मय उदगीरकर आणि प्रीतम कागणे या चित्रपटात महत्त्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. चिन्मय आणि प्रीतम या दोघांनीही यापूर्वी एकमेकांचे काम पाहिले होते; परंतु त्यांची पहिली भेट झाली ती या चित्रपटाच्या सेटवर.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिन्मय प्रीतमच्या स्वभावाबद्दल बोलताना म्हणाला, ‘‘प्रीतम अतिशय चांगली, मनमिळाऊ आणि खूप नम्र मुलगी आहे. ती खूप अभ्यासू आणि डेडीकेशनने काम करणारी अभिनेत्री आहे. या चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्या जेव्हा आम्ही एकमेकांना पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हा प्रीतम तिच्या भूमिकेविषयीच आमच्या दिग्दर्शकांना प्रश्न विचारत होती. ते पाहून मी आश्चर्यचकित झालो आणि मला तिचं हे वागणं फार आवडलं. तेव्हा तिची एक अभ्यासू कलाकार म्हणून माझ्या मनात प्रतिमा तयार झाली. एखादी गोष्ट तिला येत नसेल, तर ती गोष्ट उत्तम प्रकारे येईपर्यंत ती त्यावर मेहनत करत राहते. एखादं काम छोटं असो वा मोठं, ती त्याच्या लांबीकडे लक्ष न देता आपलं काम कसं चांगलं होईल यासाठी नेहमी झटत असते आणि जर एखादा शॉट तिच्या मनासारखा झाला नाही, तर दिग्दर्शकानं ओके म्हटलं असतानाही ती आधीपेक्षा आणखी चांगला शॉट देण्याकरिता रिटेक मागून घेते. ती खूप डेडीकेशननी काम करणारी अभिनेत्री आहे. आमच्या या चित्रपटात उन्हात अनवाणी चालायचं आहे, बैलगाडीत बसायचं आहे, असे अनेक सीन्स आहेत. हे सगळं करताना तिने कधीच आढेवेढे नाही घेतले. शिवाय तिचा स्वभाव असा आहे, की आपली पटकन गट्टी जमते तिच्याशी. त्यामुळे सेटवर आमची मजा मस्करी चालायचीच आणि त्यासोबतच आमचा चित्रपट कॉमेडी असल्यानं सीन करतानाच आम्ही तो एन्जॉय करत शूट करायचो.’’

प्रीतमनं चिन्मयबद्दल सांगितलं, ‘‘ऑफ स्क्रीन सांगायचं तर चिन्मय खूप चांगला आणि गुणी मुलगा आहे. तो डाऊन टू अर्थ आहे आणि समोर लहान-मोठी कोणीही व्यक्ती असली, तरी सर्वांशी अगदी नम्रतेने वागतो. त्याला गर्व नाही. सेटवरही स्पॉटदादा असो, एखादा जुनियर आर्टिस्ट असो किंवा दिग्दर्शक असो, तो सर्वांशी मिळून मिसळून वागतो. आमच्या चित्रपटात तो नवीन कलाकारांनाही छान सीन समजावून सांगायचा. आपल्याबरोबर समोरच्याचं कामही कसं चांगलं होईल याकडेही तो लक्ष देतो, ही त्याची गोष्ट मला सर्वांत भावली. तो कायम स्वतःला विद्यार्थीदशेत ठेवतो. एखादी नवीन गोष्ट शिकून घ्यायला तो नेहमी तयार असतो. त्याचा कॉमेडीचा सेन्स फार छान आहे पण तरीही तो सेन्स आणखी डेव्हलप करण्याकडे त्याचं लक्ष असायचं. याशिवाय तो फिटनेस फ्रिक आहे. १२ किंवा १५ तास जरी शूटिंग झालेलं असलं, तरी तो त्यानंतर न चुकता व्यायाम करायचा किंवा मग पहाटे लवकर उठून तासभर व्यायामाला द्यायचा. त्याच्यातली ही चिकाटी शिकण्यासारखी आहे.’’
(शब्दांकन : गणेश आचवल)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Chinmay Uadgirkar and Pritam Kagane