वुमन हेल्थ : गरोदरपणात त्वचेची काळजी

डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
Saturday, 5 December 2020

गरोदरपणाच्या काळात खाज येणे ही सर्वसामान्य बाब आहे. बहुतांश महिलांना या काळात पोटाला, मांडीच्या आतील बाजूस व स्तनांच्या भोवती खाज येऊ शकते. या काळात ताणली गेलेली त्वचा व हार्मोन्समधील बदलांमुळे त्वचा कोरडी पडल्याने खाज सुटते. गर्भवती महिलांना हा अनुभव आल्यास तो सर्वसाधारण असल्याचे समजावे.

गरोदरपणाच्या काळात खाज येणे ही सर्वसामान्य बाब आहे. बहुतांश महिलांना या काळात पोटाला, मांडीच्या आतील बाजूस व स्तनांच्या भोवती खाज येऊ शकते. या काळात ताणली गेलेली त्वचा व हार्मोन्समधील बदलांमुळे त्वचा कोरडी पडल्याने खाज सुटते. गर्भवती महिलांना हा अनुभव आल्यास तो सर्वसाधारण असल्याचे समजावे. त्यांना त्वचेला मॉश्‍चराईज करण्यासाठी ऑलिव्ह ऑइल किंवा खोबर्‍याचे तेल वापरता येऊ शकेल. परंतु संपूर्ण शरीराला होणारी खाज वाढत असेल व हात, पाय आणि पाठ यांना सतत खाज येत असेल किंवा खाज येण्याने जखम झाली आहे; तसेच संपूर्ण शरीराला खाज येत असेल त्यामुळे रात्रीस झोप लागणे कठिण होत असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 ऑबस्टेट्रिक कोलॅस्टॅटिस
गरोदरपणाच्या काळात हा उद्भवणारा संभाव्य विकार असून, यामध्ये यकृताच्या कार्यावर परिणाम होतो. सामान्यत: यकृतामध्ये आम्लपित्ताची निर्मिती होते आणि गॉलब्लाडरमधून योग्य  प्रमाणात आतड्यात जाते- ज्यामुळे विविध प्रकारच्या फॅट्सचे पचन होण्यासाठी साह्य करते. परंतु गरोदरपणाच्या काळात निर्माण होणार्‍या इस्ट्रोजेन हार्मोन्समुळे काही बदल होतात. परिणामी आम्लपित्त आतड्याकडे जाणे थांबते. हे आम्लपित्त उलटे फिरून यकृतामध्ये साचू लागते व तेथून ते रक्तप्रवाहात मिसळू शकते. त्यामुळे गर्भवती महिलेच्या रक्तात बाईल सॉल्ट, बाईल पिगमेंटच्या माध्यमातून आम्लाचे प्रमाण वाढते व त्यामुळे लिव्हर एंझाईनची पातळी वाढू शकते. या प्रक्रियेत मातेचे रक्त नेहमीपेक्षा काहीसे चिकट होऊ लागते. हेच रक्त गर्भावस्थेतील बाळाकडे जात असल्याने त्याच्या आरोग्यवरही परिणाम होऊ शकतो. तसेच, रक्तातील बाईल सॉल्टच्या वाढत्या प्रमाणामुळे खाज येण्याबरोबरच डोळे पिवळे पडणे, तसेच लघवीला व शौचास पिवळी होणे अशी चिन्हेही दिसू शकतात.

गर्भवती महिलेला सतत खाज येण्यामुळे रात्री झोप न लागण्याने दैनंदिन वेळापत्रक बिघडते. प्रसुती दरम्यान रक्तस्राव व प्रसूतीनंतर दुधाची निर्मिती होण्यास अडथळे येऊ शकतात. ओबस्टेट्रिक कोलॅस्टेस्टीसमुळे बाळावरही काही नकारात्मक परिणाम होतात. बरेचदा गर्भवती महिला संपूर्ण शरीराला खाज सुटल्याची समस्या घेऊन डॉक्टरकडे जातात तेव्हा डॉक्टर त्यांना लिव्हर फंक्शन टेस्ट (एलएफटी) करण्याचा सल्ला देतात. त्यावरून लिव्हर एंझाईम्सची पातळी वाढली आहे का हे समजते.  विकारादरम्यान यकृताच्या कार्यावर परिणाम होतो, त्यामुळे त्यावर पुढील काळात सातत्याने लक्ष ठेवले जाते. त्याचप्रमाणे बाळाच्या होणाऱ्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणेदेखील गरजेचे असते. गर्भवती महिलेला पहिल्या प्रसूतीदरम्यान ओबस्टॅट्रिक कोलॅस्टेटिस असेल, तर दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी हीच स्थिती पुन्हा उद्भवण्याची काही प्रमाणात शक्यता असते. त्यामुळे दुसऱ्यांदा गरोदर राहिल्यास याची कल्पना देणे आवश्यक आहे. 

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Dr Aasha Gawade on Skin care during pregnancy