
कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये झाली, तरी ती एकतर लक्षणविरहित असते किंवा सर्दी-खोकलासदृश सौम्य स्वरूपाची असते. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संसर्गाविषयी घाबरण्याचे कारण नाही; पण गेल्या सहा महिन्यांत लहान मुलांमध्ये मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी डिसीज (एमआयएस) ही गुंतागुंत काही आठवड्यांनी निर्माण होताना दिसते आहे.
कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये झाली, तरी ती एकतर लक्षणविरहित असते किंवा सर्दी-खोकलासदृश सौम्य स्वरूपाची असते. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत कोरोना संसर्गाविषयी घाबरण्याचे कारण नाही; पण गेल्या सहा महिन्यांत लहान मुलांमध्ये मल्टी सिस्टम इन्फ्लेमेटरी डिसीज (एमआयएस) ही गुंतागुंत काही आठवड्यांनी निर्माण होताना दिसते आहे. पालकांनी ती लवकर ओळखल्यास व त्वरित उपचार सुरू केल्यास ती फार गंभीर रूप धारण करणार नाही.एमआयएस ही गुंतागुंत कोरोना संसर्ग होतो तेव्हा होत नाही. कोरोना होऊन गेल्यास ३ ते ६ आठवड्यांनी मुलांमध्ये याची लक्षणे दिसून येतात.
एमआयएसचे कारण
लहान मुलांमध्ये कोरोनाविरोधात प्रतिकारशक्ती प्रभावीपणे कार्य करते, म्हणून त्यांना सौम्य स्वरूपाची लक्षणे दिसून येतात; पण प्रतिकारशक्ती बहाल करणाऱ्या अँटीबॉडी या चुकून शरीरातील काही अवयवांविरोधात कार्य करू लागतात. यामुळे मेंदू, आतडी, त्वचा, डोळे अशा अवयवांना इजा होते व या आजाराची लक्षणे दिसतात.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
निदान
तापाचे निश्चित कारण सापडत नसेल किंवा ताप हा कारण सापडूनही नियमित उपचाराला प्रतिसाद देत नसेल व ७ दिवसांपेक्षा जास्त लांबत असेल तर बालरोगतज्ज्ञ एमआयएसची शक्यता पडताळून पाहतात. यासाठी रक्तामध्ये कोरोनाविरोधात अँटीबॉडी आहेत का हे तपासले जाते व त्या पॉझिटिव्ह आल्यास निदान निश्चित केले जाते. या आजाराचे बरेच रुग्ण चुकीने डेंग्यू असल्यासारखे वाटतात. कारण कोरोना व डेंग्यूच्या अँटीजेनमध्ये काही प्रमाणात साधर्म्य असल्याने या आजारात डेंग्यूची टेस्ट पॉझिटिव्ह येते.
प्रतिबंध
Edited By - Prashant Patil