प्रत्येक पालकाला वजन वाढण्यासाठी टॉनिकचे प्रीस्क्रिप्शन हवे असते. विशिष्ट वयात काही व्हिटॅमिन्स व लोह सोडले तर नियमित द्यावे अशा टॉनिकची मुलांना गरज नसते; पण काही आजार किंवा परिस्थितीत डॉक्टरांनी स्वतःहून काही मल्टिव्हिटॅमिन ठरवून दिलेल्या कालावधीसाठी दिले तर नाकारू नये.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
गरजेचे आहे व द्यावे असे टॉनिक सप्लिमेंट्स
- बाळ नॉर्मल वजनाचे म्हणजे २.५ किलो व पूर्ण ९ महिन्यांत जन्माला आले असेल तर -
- व्हिटॅमिन डी - जन्मानंतर पहिल्या वर्षात रोज ४०० आययू ( इंटरनॅशनल युनिट्स) व्हिटॅमिन डी प्रत्येक मुलाला आवश्यक असते. यानंतर १८ वर्षाचे होईपर्यंत दर तीन महिन्यांनी ६०,००० आययू द्यायला हवे. हे तोंडावाटे द्यायचे व्हिटॅमिन असते.
- आयर्न/लोह - ६ महिन्यांनंतर वरचे अन्न सुरू केल्यापासून रोज रात्री ३ मिलिग्रॅम प्रती किलोप्रमाणे आयर्न/ लोह २ वर्षापर्यंत द्यायला हवे. या दरम्यान जर हिमोग्लोबिन ११ पेक्षा कमी असल्याचे आढळून आले, तर लोहाचे टॉनिक ६ मिलिग्रॅम/ किलोप्रमाणे ३ महिन्यांसाठी द्यावे.
- कुटुंब व मूल शाकाहारी असेल तर : कुटुंब व मूल शाकाहारी असल्यास व मूल दूध, दही व दुग्धजन्य पदार्थ खात नसल्यास बी १२ या व्हिटॅमिनची कमतरता निर्माण होते. अशा वेळी बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने बी १२ व्हिटॅमिनचे सप्लिमेंट घ्यावे लागते.
- या व्यतिरिक्त चांगला संतुलित आहार असलेल्या बाळाला नियमित टॉनिक देण्याची गरज नसते.
कमी वजनाचे व नऊ महिने पूर्ण होण्याआधी जन्माला आलेले बाळ
- या बाळाला व्हिटॅमिन डी हे नॉर्मल असलेल्या बाळासारखे द्यावे लागतेच; पण लोह/आयर्न मात्र पहिल्या महिन्यात बाळ आईचे दूध पिऊ लागले, की लगेच सुरू करावे लागते.
- व्हिटॅमिन ए, ई, के : डी व लोहाव्यतिरिक्त कमी वजनाच्या व ९ महिन्यांआधी जन्मलेल्या बाळाला हे चार व्हिटॅमिन्स असलेले औषध द्यावे लागते.
विशिष्ट्य आजारामध्ये व्हिटॅमिन
- कावीळ : काही काळासाठी व्हिटॅमिन ए, ई, के द्यावे लागतात.
- जुलाब : जुलाब बरे झाल्या नंतर एक महिना रोज ५ मिलिग्रॅम झिंक देणे गरजेचे असते. याने जुलाब होत नाहीत
- किडनी व हृदयाचे आजार : संबंधित तज्ज्ञांच्या सल्ल्याने टॉनिक द्यावे लागतात.
- अतिचंचल मुले : ओमेगा थ्री असलेले सिरप द्यावे लागते.
- वारंवार तोंड येत असल्यास : बी कॉम्प्लेक्स, फोलिक अॅसिड, बी १२ ही व्हिटॅमिन्स द्यावे लागतात.
- गोवर : व्हिटॅमिन ए द्यावे लागते.
- स्कर्व्ही : व्हिटॅमिन सीच्या तीव्र कमतरतेमुळे होणाऱ्या या आजारात व्हिटॅमिन सी द्यावे लागते.
Edited By - Prashant Patil
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title:
article write dr amol annadate on Should children be given a tonic