वुमन हेल्थ : प्रसूतीसाठी जातानाची बॅग

डॉ. आशा गावडे, स्त्रीरोगतज्ज्ञ
Saturday, 28 November 2020

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी बॅग भरताना त्यात नक्की काय असावे, याबाबत अनेक लोकांच्या मनामध्ये शंका असते. हॉस्पिटलकडून आपल्याला काय दिले जाईल, आपण कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि कपडे घेऊन जावेत हा प्रश्‍न अनेकांसमोर असतो. शक्य असेल तर दोन स्वतंत्र बॅगा भराव्यात.

प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी बॅग भरताना त्यात नक्की काय असावे, याबाबत अनेक लोकांच्या मनामध्ये शंका असते. हॉस्पिटलकडून आपल्याला काय दिले जाईल, आपण कुठल्या प्रकारच्या वस्तू आणि कपडे घेऊन जावेत हा प्रश्‍न अनेकांसमोर असतो. शक्य असेल तर दोन स्वतंत्र बॅगा भराव्यात. एक मातेसाठी आणि एक नवजात बालकासाठी. बालकासाठीच्या बॅगेबद्दल आपण गेल्या आठवड्यात पाहिले. या वेळी मातेसाठीच्या बॅगेत कोणत्या गोष्टी असाव्यात ते बघू.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आवश्यक साहित्य 
अनेक हॉस्पिटल्समध्ये प्रसूतीनंतर मातेला लागणाऱ्या अनेक वस्तू एका किटमध्ये पुरवल्या जातात. छोट्या ट्रॅव्हल बॅगप्रमाणे टूथब्रश, टूथपेस्ट, कंगवा, पेन, तेल, दोन वेगवेगळ्या स्लीपरचे जोड इत्यादी साहित्य यामध्ये असते. त्याबाबत तुम्ही खात्री करून घ्या आणि नसेल तर तुम्ही स्वत:चे साहित्य घेऊन जाऊ शकता.
 
मॅटर्निटी गाऊन 
प्रसूतीनंतर मातेने वापरण्याच्या मॅटर्निटी गाऊन रुग्णालयातर्फे दिला जातो. परंतु, ते सोईस्कर वाटत नसल्यास आपल्या बॅगेत २ मॅटर्निटी किंवा फीडिंग गाऊन्स असणे आवश्यक असते. त्यामुळे बाळाला स्तनपान करणे सोपे जाते. 
याशिवाय ॲडल्ट डायपर्स, मॅटर्निटी पॅड्सचादेखील उपयोग होऊ शकतो. 

याही गोष्टी असूद्यात 
याबरोबरच हॉस्पिटलमध्ये जाताना बॅगेत महत्त्वाच्या आणि न चुकता बरोबर नेण्याच्या काही गोष्टी असतात; त्या अशा  

  • हॉस्पिटलची फाइल, सोनोग्राफी, ब्लड आणि इतर पॅथोलॉजी रिपोर्ट्स 
  • इन्शुरन्स फाइल 
  • दागिन्यांसाठी छोटी बॅग 

हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यापूर्वी मातेने अंगठी, गळ्यातील नेकलेस, इअरिंग्ज, पायातील जोडवी, बांगड्या इत्यादी सर्व दागिने शक्यतो घरीच ठेवणे आवश्यक आहे. ऑपरेशन थिएटरमध्ये दागिने नेण्यास परवानगी नसते. 
 
बॅग कधी तयार करावी?
अत्यंत योग्य वेळ सांगायची झाल्यास प्रसूतीच्या नवव्या महिन्यात म्हणजेच ३४ आठवड्यांनंतर ही बॅग तयार करावी.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article write dr asha gawade on women health