मेमॉयर्स : माझी ‘बेस्ट फ्रेंड’

Sania-Chaudhary
Sania-Chaudhary

मी पुण्याची आहे. माझं घर म्हणजे पारंपरिक संस्कार आणि प्रगल्भ विचार, अशा दोन्ही गोष्टींचा सुंदर मिलाफ आहे. आई आणि मुलीचं नातं नेहमीच स्पेशल असतं. माझं माझ्या आईसोबत मैत्रीचं नातं आहे. माझ्या आईचं नाव मनीषा बेंद्रे-चौधरी. ती इंटिरिअर डिझायनर आहे. अतिशय हुशार, क्रिएटिव्ह आणि स्ट्राँग पर्सनॅलिटी असणारी कर्तबगार स्त्री. माझी आई प्रत्येक गोष्ट खूप विचारपूर्वक करते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती खूपच नम्र आहे. तिला लहानपणापासूनच मॉडेलिंग क्षेत्राची आवड होती. पण, त्या काळात तिला ते शक्य झालं नाही. आज मी तिच्या स्वप्नांची पूर्ती अभिनय क्षेत्राच्या माध्यमातून करते आहे, याचा मला खूप आनंद आहे आणि माझ्यापेक्षा जास्त आनंद तिला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘सांग तू आहेस का’ ही मुख्य भूमिकेतील माझी पहिलीच मालिका. मालिकेचा पहिला प्रोमो आल्यापासूनच खूप फोन कॉल्स माझ्या आईला आणि मला आले. तिच्या चेहऱ्यावरच्या आनंदाची सर दुसऱ्या कशालाच नाही, असं मला वाटतं. यापूर्वी मी ‘साजणा’ या मालिकेत अभिनय केला आहे.

मला लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती. आई-बाबांनी मला लहानपणापासूनच प्रोत्साहन देत माझी आवड जोपासली. मी गेली १५ वर्षं कथक नृत्य शिकते आहे. माझं मास्टर्सही मी कथकमध्येच करते आहे.

त्याचबरोबर लॅटिन अमेरिकन डान्स स्टाईलही शिकत आहे. यात मला माझ्या आईचा खंबीर पाठिंबा आहे. त्यामुळेच शूटिंग आणि नृत्य ही तारेवरची कसरत मी करू शकते. आत्तापर्यंत मी एकही अशी ऑडिशन दिलेली नाही, जिथं आई माझ्यासोबत नव्हती. व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत ती माझ्या प्रत्येक ऑडिशनसाठी माझ्यासोबत असते. माझी आई माझी बेस्ट फ्रेंड आहे. मी तिच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते. प्रोफेशनल, पर्सनल वा कोणत्याही मुद्द्यावर मी तिच्यासमवेत मनसोक्त गप्पा मारू शकते. आम्ही दोघीही चहाप्रेमी आहोत. त्यामुळे दुपारी चार वाजले, की आलं घातलेला कमी साखरेचा चहा आम्ही दोघी अगदी गप्पा मारत संपवतो. चहा करण्याचा कधी आईचा टर्न असतो, तर कधी माझा. 

‘स्टार प्रवाह’वरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेचं चित्रीकरण सध्या सुरू असल्यामुळे आईच्या हातचा चहा मी खूप मिस करतेय. माझी आई खूप विचारपूर्वक सर्व गोष्टी करते. तिचा तोच गुण माझ्यातही उतरला आहे. त्यामुळे मीदेखील कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घेते. माझी आई मांसाहारी जेवण उत्तम करते. तिच्या हातची फिश करी मला खूप आवडते. माझा नृत्य आणि अभिनयाचा प्रवास आई-बाबांमुळे खूपच चांगल्या पद्धतीनं सुरू आहे. आगामी काळातही मी प्रेक्षकांना भावतील अशा उत्तम भूमिका साकारणार आहे.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com