
तुम्ही व्यासपीठावर बोलत असा किंवा चारचौघांत किंवा अगदी कुटुंबीयांमध्ये; तुमच्या बोलण्यात जितका ठामपणा असेल, तितकं ते बोलणं गांभीर्यानं घेतलं जाण्याची शक्यता जास्त असते. हा ठामपणा अचानक येत नसतो. तो तयारीनं येतो आणि बोलण्यातल्या चुका आपण कशा प्रकारे सुधारू शकतो त्यातल्या हुशारीवरूनही येतो.
तुम्ही व्यासपीठावर बोलत असा किंवा चारचौघांत किंवा अगदी कुटुंबीयांमध्ये; तुमच्या बोलण्यात जितका ठामपणा असेल, तितकं ते बोलणं गांभीर्यानं घेतलं जाण्याची शक्यता जास्त असते. हा ठामपणा अचानक येत नसतो. तो तयारीनं येतो आणि बोलण्यातल्या चुका आपण कशा प्रकारे सुधारू शकतो त्यातल्या हुशारीवरूनही येतो. हा ठामपणा दिसण्यासाठी वरची पट्टी लावण्याची आवश्यकता नाही. अगदी नॉर्मल स्वरात बोलतानाही आपण ठामपणा आणू शकतो. त्यासाठी स्वतःच्या विचारांवर आणि बोलण्यावर दोन्ही विश्वास असला की झालं.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
तुमची विचारांची आणि बोलण्यातल्या शब्दांची गती यांच्यात असमानता असली, तरी बोलण्यातला आत्मविश्वास ढासळू शकतो. म्हणजे, डोक्यात तयार होणारे शब्द आणि बोलण्याचे शब्द, यांच्यात समन्वय बरोबर राहील, याची दक्षता घ्या. त्यामुळे योग्य सराव केला, तरी खूप फायदे होतात. ठामपणा हा पुन्हा स्वभावाचाही एक भाग असतो. तो मुद्दाम आणता येत नाही. मात्र, बोलण्यातला ठामपणा आपण सरावानं नक्की आणू शकतो. तसंच, समजा अनुनासिक बोलण्यातले काही दोष जर प्रयत्न करूनही जाणार नसतील, तर त्यामुळे स्वतःच्या आत्मविश्वासावर कोणताही परिणाम होऊ न देणं, ही गोष्टही महत्त्वाची. ‘बिलिव्ह इन यू’ हा मंत्रही नेहमीच लक्षात ठेवायचा.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
अनेक जण बोलताना अडखळतात. त्यात प्रत्येक वेळी वाचादोष असतोच, असं नाही. उलट अनेकदा आत्मविश्वासाच्या अभावामुळं अडखळलं जातं. त्यासाठी सगळ्यांत उत्तम उपाय म्हणजे आरशाच्या समोर उभं राहून सलग काही बोलण्याचा सराव करणं. ‘किंग्ज स्पीच’ नावाचा टॉम हूपर दिग्दर्शित एक उत्तम चित्रपट आहे. त्यात ब्रिटनमधला राजा बोलण्यातल्या अडखळण्याच्या दोषावर कशी मात करतो, ते दाखवलं आहे. तो शक्य असेल तर नक्की बघा. महत्त्वाची चर्चा करायची असेल, तर त्याआधी काही मुद्दे कागदावर लिहून घेता येतात का, ते बघा. त्यामुळेही नंतरच्या चर्चेत ठामपणा येतो.
‘बोल’के मंत्र
मुलांना हे सांगा
Edited By - Prashant Patil