मेकओव्हर : केसांना प्रथिनं आणि नवा लुक

सुवर्णा येनपुरे-कामठे
Tuesday, 29 December 2020

केस कुरळे किंवा फ्रिजी असल्यास त्यांची हेअरस्टाईल कशी करायची, त्यांना सतत कसे सांभाळायचे, हा प्रश्‍न असतोच. इतर काही उपाय केसांवर करायचे म्हणजे केस खराब व्हायची शक्यताही जास्त असते. त्यामुळेच, अशा वेळेत प्रसिद्धीस आली ती केराटीन ट्रीटमेंट! ऊन, प्रदूषण यामुळे रूक्ष, खराब झालेल्या केसांची नैसर्गिक प्रथिने पुन्हा मिळविण्याच्या उपचारालाच ‘केराटिन प्रोटीन ट्रीटमेंट’ असे म्हणतात.

केस कुरळे किंवा फ्रिजी असल्यास त्यांची हेअरस्टाईल कशी करायची, त्यांना सतत कसे सांभाळायचे, हा प्रश्‍न असतोच. इतर काही उपाय केसांवर करायचे म्हणजे केस खराब व्हायची शक्यताही जास्त असते. त्यामुळेच, अशा वेळेत प्रसिद्धीस आली ती केराटीन ट्रीटमेंट! ऊन, प्रदूषण यामुळे रूक्ष, खराब झालेल्या केसांची नैसर्गिक प्रथिने पुन्हा मिळविण्याच्या उपचारालाच ‘केराटिन प्रोटीन ट्रीटमेंट’ असे म्हणतात. या उपचारामध्ये कृत्रिम केराटीन टाकले जाते. असे केल्याने आपले केस मऊ आणि चमकदार होतात. सध्याच्या काळात ही ट्रीटमेंट चांगलीच ट्रेंडमध्ये आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

केराटीन ट्रीटमेंटचे फायदे

  • केराटीन ट्रीटमेंट किंवा उपचार केल्याने केस चमकदार होतात आणि केस स्ट्रेट होऊ लागतात.
  • केसांमध्ये गुंता कमी होतो. केस मोकळे सोडल्यासही फारसा त्रास होत नाही.
  • प्रदूषणापासून केस वाचतात.
  • मऊ आणि सरळ झाल्यामुळे आपण केसांची कोणतीही हेअर स्टाईल करू शकता. स्ट्रेटनर वापरण्याची आवश्‍यकता पडत नाही.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

केराटीन ट्रीटमेंटचे तोटे

  • केराटीन प्रोटीन ट्रीटमेंट केल्यावर आपल्याला पार्लरमधूनच स्पेशल शाम्पू आणि कंडिशनर वापरण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय आपण कोणतेही दुसरे उत्पादन वापरू नये.
  • केराटीन केल्यावर केस पूर्णपणे स्ट्रेट दिसतात, त्यामधून व्हॉल्यूम आणि बाउन्स नाहीसे होतात.
  • केस खूप लवकर तेलकट होतात; ज्यामुळे केसांना वारंवार शाम्पू करावे लागते.
  • या उपचारावर खूप पैसे खर्च होतात. असे करून देखील याचा परिणाम केवळ पाच ते सहा महिन्यांपर्यंतच असतो.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Suvarna Yenpure Kamathe on Hair Keratin Treatment

Tags
टॉपिकस
Topic Tags: