मेकअप-बिकअप : वॅक्सिंगला एपिलेटरचा पर्याय! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Epilator

मेकअप-बिकअप : वॅक्सिंगला एपिलेटरचा पर्याय!

खास कार्यक्रमांना जाण्यासाठी, खास दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी प्रत्यक्ष मेकअप कार्यक्रमाच्या दिवशी होत असला तरी त्याची सुरुवात मात्र दोन दिवस आधीपासूनच होत असते. फेशिअल, वॅक्सिंग, ब्लिचिंग, थ्रेडिंग ही त्यातीलच काही उदाहरणे!

पैकी वॅक्सिंग हे खर्चाऊ तर असतेच, तसेच वेळखाऊही असते. सध्या दैनंदिन जीवनातही चांगले दिसावे, असे प्रत्येक मुलीलाच वाटत असते. त्यामुळे वॅक्सिंग हे थ्रेडिंगइतकेच महत्त्वाचे बनले आहे. यासाठी दर पंधरा दिवसांनी किंवा महिन्याने पार्लरमध्ये जावे लागते. त्यातच इतर व्यक्तींच्या संपर्कात येणे धोक्याचे असल्याने स्वतःहून करता येतील अशा पर्यायांनी लक्ष वेधून घेतले. घरच्याघरी वॅक्सिंग करण्यासाठी काही क्रीम बाजारात उपलब्ध आहेत, मात्र इतर पर्याय नसेल अशा वेळी वापरण्याचे ते साधन आहे. कारण, यामुळे त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता अधिक असते. अशामध्येच चर्चा आहे, ती ‘एपिलेटर’ची!

  • एपिलेटर हे केस काढण्यासाठी वापरले जाते. हे रेझरपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने काम करते. एपिलेटर केस मुळापासून काढते. त्यामुळे केस लवकर वाढत नाहीत.

  • केस मुळापासून काढत असल्याने एपिलेटर सुरवातीला त्रासदायक वाटू शकते.

  • स्नान करून, त्वचेला बॉडी स्क्रब लावल्यानंतर एपिलेटर वापरणे उत्तम! यामुळे पोअर्स खुले होतात आणि त्रास कमी होतो.

  • नव्याने एपिलेटर वापरण्यास सुरुवात करीत असल्यास संवेदनशील त्वचेवर वापरू नका.

  • एपिलेटरचा वापर शक्यतो, संध्याकाळी किंवा रात्री करावा. कारण, केस काढून टाकल्यानंतर आपली त्वचा नाजूक बनते. त्यामुळे एपिलेटरचा वापर करून उन्हात गेल्यास त्वचेला त्रास होऊ शकतो.

loading image
go to top