esakal | मेकअप-बिकअप : गालावरची लाली टिकवण्यासाठी

बोलून बातमी शोधा

Makeup
मेकअप-बिकअप : गालावरची लाली टिकवण्यासाठी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मेकअप करून झाला, की सर्वांत शेवटी लावले जाते ते म्हणजे ब्लश! मेकअपमध्ये नैसर्गिकरीत्या आकर्षित करून घेणारी हीच ती लाली असते. त्याला जेवढे नैसर्गिक रूप देता येईल, तेवढा मेकअप आकर्षक ठरतो. मात्र, यासाठी गरज असते ती ब्लशच्या योग्य रंगाची निवड करण्याची... ही निवड चुकली, की मात्र मेकअपमध्ये गडबड होऊ शकते.

  • ब्लशचा योग्य रंग निवडण्यासाठी आपल्या गालांवर नैसर्गिकरीत्या कोणता रंग येतो याचे निरीक्षण करा आणि त्याच्याशी मिळताजुळता ब्लशचा रंग निवडा. दुसरा पर्याय म्हणजे ओठांच्या गुलाबी रंगाशी जुळणारा रंग निवडा.

  • ब्लश पावडर, क्रीम, लिक्विड; तसेच जेल स्वरूपातही येते. तुम्ही ब्लशचा कोणताही प्रकार निवडू शकता. तेलकट चेहरा असल्यास पावडर, लिक्विड किंवा जेलचा वापर करू शकता, तर कोरड्या त्वचेसाठी क्रीम ब्लश वापरू शकता. ब्लश चांगले दिसावे यासाठी पावडर आणि क्रीमचे कॉम्बिनेशन वापरू शकता.

  • ब्लश लावण्यासाठी ब्लशसोबत येणारा ब्रश वापरू नये. यासाठी खास ब्लशरचाच वापर करावा. ब्लशर हा खास वेगळा ठेवावा. तो पुन्हा पावडर लावण्यासाठी घेऊ नये.

  • ब्लशरवर ब्लश घेतल्यानंतर तो थोडा झटकावा, यामुळे अधिकचे ब्लश झटकले जाईल आणि योग्य प्रमाणात ब्लश चेहऱ्यावर लागेल.

  • ब्लश लावताना चेहरा हसरा ठेवावा, त्यानंतर वर येणाऱ्या गालावर ब्लश लावावे.

  • ब्लश योग्य पद्धतीने वापरला न गेल्यास, चेहरा विदूषकासारखा किंवा बार्बी डॉलसारखा कृत्रिम दिसू शकतो.