esakal | मेकअप-बिकअप : कजरारे, कजरारे नैना...
sakal

बोलून बातमी शोधा

Eye Makeup

मेकअप-बिकअप : कजरारे, कजरारे नैना...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

डोळ्यांच्या मेकअपसाठी काजळ महत्त्वाचे असते, किंबहुना काजळाचा वापर तुम्ही रोजही करू शकता. यामुळे डोळ्यांचा मेकअप खुलून दिसतो. पूर्वी डबीत येणारे काजळ आता पेन्सिलच्या स्वरूपात बाजारात मिळू लागले आहे. त्यामुळे हे लावणे अधिक सोपे झाले आहे. डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर काजळ लावत असल्याने, काजळ नेहमी चांगल्या प्रतीचे असेल याची खात्री करून घ्या. काजळ मऊ आणि क्रिमी रूपातले असल्याने ते सहज डोळ्यांमध्ये लागते. त्यासाठी योग्य पद्धत आपण जाणून घेऊ.

  • डोळ्यांना काजळ लावण्याआधी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.

  • त्यानंतर कोरड्या कापडाने डोळ्यांच्या कडा स्वच्छ पुसून कोरड्या करा.

  • त्वचा तेलकट असल्यास, ती फेस पावडरच्या साह्याने कोरडी करून घ्या.

  • डोळे मोठे असल्यास, डोळ्याच्या वॉटरलाइनवर आधी काजळ लावा. मग हे काजळ गडद करण्यासाठी बाहेरील बाजूने आतील बाजूला काजळ लावा.

  • डोळे छोटे असल्यास, वॉटरलाइनवर काजळ लावू नका. यामुळे तुमचे डोळे आणखी छोटे वाटू लागतील. अशावेळी बाहेरील बाजूला काजळ लावावे.

  • काजळ पेन्सिल एकाच ठिकाणाहून दोन ते तीन वेळा फिरवा, यामुळे काजळ गडद होईलच शिवाय ते अधिक काळ टिकेल.

  • स्मज ब्रशच्या साह्याने तुम्ही डोळ्यांना स्मज लूकसुद्धा देऊ शकता.

  • काजळ बहुतांश वेळेला खालच्या बाजूलाच लावले जाते, मात्र तुम्ही वरच्या बाजूला आयलायनर लावणार नसल्यास त्या जागी काजळ लावू शकता.

  • बाजारात विविध रंगांची काजळेही उपलब्ध आहेत. एखाद्या दिवशी वेगळा लूक देण्यासाठी तुम्ही वेगळ्या रंगाचे काजळही वापरू शकता.