माय फॅशन : ‘कपड्यांची नेमकी निवड महत्त्वाची’

मला कपड्यांमध्ये साडीपासून मिनीजपर्यंत सगळं आवडतं. मी सगळं आत्मविश्वासाने कॅरी करू शकते अन् मी सगळ्यांचीच खरेदीही करत असते.
My Fashion
My FashionSakal
Summary

मला कपड्यांमध्ये साडीपासून मिनीजपर्यंत सगळं आवडतं. मी सगळं आत्मविश्वासाने कॅरी करू शकते अन् मी सगळ्यांचीच खरेदीही करत असते.

मला कपड्यांमध्ये साडीपासून मिनीजपर्यंत सगळं आवडतं. मी सगळं आत्मविश्वासाने कॅरी करू शकते अन् मी सगळ्यांचीच खरेदीही करत असते. मला वेगवेगळ्या प्रकारचे कपडे खूप आवडतात. त्यामुळे मी प्रचंड खरेदी करत असते. कपड्यांच्या शॉपिंगचा मला आजार आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

फॅशन करणं आणि आपल्याला हवे ते कपडे घालणं हा प्रत्येकाचा हक्क आहे. त्यामुळे दुसऱ्याने सांगितलं किंवा दुसऱ्याला काय वाटेल, असा विचार करताना कधीही कपड्यांची निवड करू नये किंवा परिधान करू नये. एखादा ड्रेस अंगावर किती छान दिसतोय, असं कुणी म्हटलं तरी तो खरेदी करू नये. कारण, आपल्याला आवडतील ते, आपल्याला सूट होतील अन् मानवतील तेच कपडे आपण घालावेत. दुसऱ्याचा चॉईस किंवा दुसऱ्याला चांगले दिसतात म्हणून ते कपडे आपण घालू नयेत.

कपड्यांच्या रंगांची निवड हा फारच महत्त्वाचा विषय असतो. कारण, दागिन्यांमध्ये गोल्डन, सिल्व्हर आणि फारसे चॉईसेस नसतात; पण कपड्यांमध्ये चॉइस करायला खूप ऑप्शन असतात. आपल्या रंगाला जे कपडे सूट होतील, याचा तर विचार करावाच; पण हे कपडे आपण कुठल्या वेळेला घालावेत याचाही विचार करावा.

कारण, लग्नात, पार्टीला, कार्यक्रमाला, ऑफिसला किंवा जिथं जातो त्याला अनुरूप कपडे व पॅटर्न ठरवणं खूप गरजेचं आहे. केवळ ड्रेस कोड लाल आहे, म्हणून भडक लाल रंगांचे कपडे दुपारी बारा वाजता घालू नयेत. समजा ड्रेस कोड लाल असेल, अन् सोशल फंक्शन असेल, तर कॉटनची लाल रंगांची साडीसुद्धा छान दिसते. त्यामुळे आपण कुठं चाललो आहोत, कुठल्या वेळेला चाललो आहोत आणि आपण तिथं काय म्हणून चाललो आहोत हे लक्षात घेऊन कपड्यांच्या रंगांची निवड करावी. त्यानुसारच दागिनेही घालावेत. सगळं मॅचिंग करण्यापेक्षा कॉन्स्ट्रास्ट किंवा स्टेटमेंट ज्युलरी अशा गोष्टींचा नक्कीच वापर करता येईल. मी स्वतः उंच असल्याने, उंच महिलांनी केलेली फॅशन मला खूप आवडते. सुश्मिता सेन आणि प्रियांका चोप्रा या दोघीही माझ्या फॅशन आयकॉन आहेत. त्यांनी कुठलेही कपडे घातले तरी त्या उठून दिसतात. कुठलाही ड्रेस कॅरी करण्याचा त्यांचा कॉन्फिडन्स मला खूप भावतो. सुश्मिताचे तर कपडे खूपच छान असतात.

फॅशन टिप्स

  • कपडे परिधान करताना कम्फर्ट ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे.

  • तुम्हाला कुठं जायचं आहे, त्याला अनुसरून कपडे घाला. प्रसंगानुरूप कपडे घालणं महत्त्वाचं.

  • दागिन्यांचा भडीमार करू नका. ही माझी सर्वांत महत्त्वाची फॅशन टीप आहे. आपल्या आउटफिटवर छान दिसतील, तुमच रूप सुंदर दिसेल असे मोजकेच दागिने घाला.

  • चांगले कपडे, चांगल्या दागिन्यांबरोबरच चांगला मेकअपही महत्त्वाचा आहे. मेकअप म्हणजे चेहऱ्यावर खूप रंग लावणं, असं नाही. साधा मेकअपही तुमचं व्यक्तिमत्त्व खूप प्रभावित करू शकतो.

  • कपड्यांबरोबर कुठले शूज किंवा सँडल घालता, हे महत्त्वाचं आहे. कारण ते कम्फर्टेबल असले पाहिजेत अन् कपड्यांना मॅच करणारेही असावेत किंवा कॉन्स्ट्रास्टही असले तरी हरकत नसावी.

(शब्दांकन : अरुण सुर्वे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com