
मला एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल, तर माझा कपड्यांचा प्रकार म्हणजे साडी. मला साडी नेसायला खूप आवडते. विशेष म्हणजे साडी हा प्रकार भारतीय संस्कृतीला शोभून दिसतो.
मला एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल, तर माझा कपड्यांचा प्रकार म्हणजे साडी. मला साडी नेसायला खूप आवडते. विशेष म्हणजे साडी हा प्रकार भारतीय संस्कृतीला शोभून दिसतो. साडीमध्ये युवती आणि महिलांचे व्यक्तिमत्त्व खूप उठून दिसते. साधी डेनिम व लूझ शर्टही घालून जायला आवडतं. ते माझ्यासाठी खूप कंफर्टेबल असतं.
फॅशन करताना किंवा साडी परिधान करताना काळजी घ्यावी लागते; पण प्रत्येकाला आपली शरीरयष्टी माहीत असायला पाहिजे. त्यानुसार आपल्याला कोणते कपडे उठून दिसतात, याचा विचार करूनच वेशभूषा करावी. तसेच, प्रत्येकाला वेगवेगळे पॅटर्न व रंग आवडतात, त्यांनी त्यानुसार कपडे घ्यावेत. कारण, त्यातूनच तुमचं व्यक्तिमत्त्व फुलणार असतं.
तुम्ही एखादा फंक्शनला जाणार असाल,, तर त्याची वेळही महत्त्वाची असते. जर सकाळी कार्यक्रमाला जाणार असाल, तर लाइट कलर चांगले दिसतात आणि रात्रीच्या वेळी जाणार असाल, तर गडद रंग चांगले दिसतात.
जे कपडे आपल्या शरीरयष्टीला सूट होत नाहीत, असे कपडे घालणं टाळावं. मात्र, तरीही तुम्ही ते कपडे मोठ्या आत्मविश्वासानं कॅरी करू शकत असाल, तर नक्की त्यांचा विचार करावा. स्टाइल आपल्यासाठी कम्फर्टबल असणं, अन् ती आपण कॅरी करू शकणं, ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. हाच माझा फॅशन फंडा आहे.
मला पेस्टल कलरचे कपडे खूप आवडतात अन् ते मला उठूनही दिसतात. अभिनयात असल्यानं मला कपडे अन् रंगांबाबत खूप काळजी घ्यावी लागते. मला सोनम कपूर हिची स्टाइल अन् ड्रेसेस खूप आवडतात. तसेच, आत्मविश्वासाच्या बाबतीत प्रियांका चोप्रा खूप आवडते. मी या दोघींनाही फॉलो करते.
फॅशन टिप्स
आपली शरीरयष्टी कशी आहे, त्यानुसार आपण स्टाइल करावी.
कार्यक्रम कोणता आहे, त्यानुसार आऊटफिटची निवड करावी.
नवनवीन स्टाइल ट्राय कराव्यात. कारण त्यातून आपल्याला कोणती स्टाइल आवडते, हे लक्षात येईल.
तुमच्या कल्चरला सोडून वेगळी फॅशन करू नका. कारण, तसं राहणीमान आपल्याला प्रेझेंट करणं सोपं जातं.
कंफर्टला जास्तीत जास्त महत्त्व द्या. कारण त्यातूनच तुम्ही खऱ्या अर्थानं व्यक्त होत असता. अनकम्फर्टेबल कपडे, शूज, सॅण्डल वा ज्वेलरी घातली तर ते हास्यास्पद होतं. त्यामुळे तुम्हाला ज्या-ज्या गोष्टी सूट करतात, त्यांनाच पहिले प्राधान्य द्या.
(शब्दांकन : अरुण सुर्वे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.